‘आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल’, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला आपल्या खास शैलीत उत्तर देत खोचक सल्ला दिला आहे. (Hasan Mushrif suggest Devendra Fadnavis to read spiritual books).

'आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल', हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 3:35 PM

कोल्हापूर : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी जाहीर केलेला मदत तोकडी असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली (Hasan Mushrif suggest Devendra Fadnavis to read spiritual books). यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांच्या आरोपाला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. हे देवेंद्र फडणवीस यांना खटकल्यानेच त्यांनी ही टीका केल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणीस यांनी मनशांतीसाठी अध्यात्मिक पुस्तकं वाचावीत, असा सल्लाही दिला.

हसन मुश्रीफ म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी पुस्तक वाचण्याचा माझा सल्ला धुडकावलेला दिसतो आहे. आजच त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी कोकणवासीयांना चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी दिलेले 100 कोटी रुपयांची मदत तोकडी असल्याचं म्हटलं. तसेच सरकारला अॅक्शन पॅरालिसीस झाल्याची टीका केली आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहाणी केली तेव्हा 100 कोटी रुपयांची तात्पुरती मदत जाहीर करतानाच त्यांनी सांगितलं होतं, की पंचनामे झाल्याशिवाय ठोस मदत घोषित करता येणार नाही. मात्र, शासनाच्या अत्यावश्यक कामांसाठी त्यांनी 100 कोटी रुपयांची घोषणा केली. तात्काळ पंचनामे करुन जितकं नुकसान झालं असेल तितकी मदत देण्याच सरकार प्रयत्न करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. असं असतानाही देवेंद्र फडणवीस जी वक्तव्यं करत आहेत, ती हास्यास्पद आहेत.”

“कोरोना विषाणूविरोधात 200 राष्ट्र झगडत आहेत, संघर्ष करत आहेत. असं असताना आपल्या राज्यात कोरोनाचं संकट नियंत्रणात आणलेलं आहे. यातच सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 5 व्या क्रमांकाचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हटलं आहे. मला वाटतं हीच गोष्ट फडणवीस यांना खटकली असावी. जेव्हा जेव्हा कोरोनाचे रुग्ण किंवा मृत्यू कमी होतात तेव्हा तेव्हा हे लपवाछपवी सुरु असल्याचा आरोप करतात. ऑक्सफर्ड विद्यापीठ, चीन आणि ट्रम्प यांनी सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लस येणार अशी घोषणा केल्याचं आज मी बातम्यांमध्ये वाचलं. आता ही लस आल्यावर कोरोना संपला तर फडणवीस काय म्हणतील असं आठवलं की मला हसू येतं. म्हणून माझी आजही त्यांना विनंती आहे की मौनः सर्वार्थ साधनम हे पुस्तक वाचावं. मनाला शांती लाभायची असेल तर मौन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रतिकुल काळात आध्यात्म हाच उपाय आहे. त्यांनी ही पुस्तकं वाचावी असाच माझा त्यांना सल्ला असेल,” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“साखर कारखान्यांना मुदतवाढ, मग ग्रामपंचायतींना का नाही?”

राज्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य मुदतीनंतर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच साखर कारखान्यांसह अनेक ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली, पण ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्याऐवजी प्रशासक नेमण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, केंद्र सरकारने 73 वी घटना दुरुस्ती करुन लोकसभा-विधानसभेप्रमाणे ग्रामपंचायतींना देखील 5 वर्षांचा कार्यकाळ दिला आहे. आता ग्रामपंचायतींना मुदतवाढ देणे घटनाबाह्य ठरलं असतं. त्यामुळे इच्छा असूनही मुदतवाढ न देता प्रशासक नेमावा लागत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरु

पुण्यातील मंचरमध्ये ‘कोरोना’ बचावासाठी शक्कल, ‘छत्री पॅटर्न’ नेमका काय?

होम क्वारंटाईन कुणाला करावे, कोणाला नाही? वादळग्रस्त रायगडसाठी नियमावली

Hasan Mushrif suggest Devendra Fadnavis to read spiritual books

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.