Bakrid 2020 | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत बैठक, मुस्लिम नेत्यांचं काय ठरलं?

| Updated on: Jul 27, 2020 | 7:32 PM

बकरी ईद नियमावलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (27 जुलै) बैठक बोलावली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीसह समाजवादीचे नेते उपस्थित होते (Sharad Pawar meet on Bakrid 2020 Guidelines).

Bakrid 2020 | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत बैठक, मुस्लिम नेत्यांचं काय ठरलं?
Follow us on

मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. मात्र, या नियमावलीवर काही मुस्लिम नेते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (27 जुलै) बैठक बोलावली (Sharad Pawar meet on Bakrid 2020 Guidelines). या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीसह समाजवादीचे नेते उपस्थित होते. या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.

“मंत्रिमंडळातील नेत्यांची नियमावली तयार करण्याची जबाबदारी असते. पण सगळे तमाशा बघत आहेत. आज सर्व मुसलमान त्रस्त आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांचे बकरे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत, बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. या सणानिमित्ताने शेतकऱ्यांना 300 ते 400 कोटी रुपये मिळतात”, असं अबू आझमी म्हणाले (Sharad Pawar meet on Bakrid 2020 Guidelines).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“शरद पवार यांचे आम्ही खूप आभारी आहोत की, त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची सूचना दिली आहे. आम्ही सर्व मुख्यमंत्र्याकडे आमची बाजू मांडणार आहोत. सरकारने ट्रान्सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे नाशिकहून किंवा इतर भागातून ट्रकभरुन येणारे बकरे मुंबईत कसे येणार? हा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिली.

काँग्रेस नेते झिशान सिद्दीकी यांनीदेखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “बैठकीत शरद पवार यांच्यासह प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी होते. आम्ही सर्वांनी त्यांच्याजवळ बकरी ईदच्या नियमावलीत शिथिलता देण्यात यावी याबाबत विनंती केली. या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन बकरा खरेदी करण्याबाबत आमचा मुद्दा होता. ऑनलाईन बकरा खरेदी तर आता काही प्रमाणात होत आहे. याबाबत काही मागण्या होत्या. या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे”, असं झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स