एकच सांगतो… हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही; शरद पवार यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे असल्याचं म्हणच शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी बीकेसी येथील सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.

एकच सांगतो... हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही; शरद पवार यांचा इशारा
| Updated on: May 17, 2024 | 9:33 PM

महायुतीची शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा सुरू आहे. शरद पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हा आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संकटाच्या काळात तुम्हाला वाचवलं. तुम्ही विसरला. तुम्ही काहीही म्हटलं टिकाटिप्पणी केली. तरी मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार जो उद्धव ठाकरे घेऊन जात आहे, त्यामागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही टीका केली तरी राज्यातील सामन्य माणूस ढुंकूनही पाहणार नाही. तुम्ही आमच्यावर टीका केली. महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो तर माणूस गेल्यावर असतो. आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने आमच्याकडे आहे, त्याची उपयुक्तता घेतली जाईल, असं शरद पवार म्हणाले.

देशाचं संविधान वाचवण्याची गरज आहे. जे विचाराने सोबत नाही, त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं प्रशासन दिलं. शाळा, आरोग्याच्या सुविधा दिल्या. दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. पण त्यांचं काम ज्यांना मंजूर नाही ते मोदींनी त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्यांना आणि राज्यकर्त्यांना विविध प्रश्नावर धोरणं ठरवायची असतात. ती ठरवण्यासाठी केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. अनेक राज्याच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. मी म्हणले तीच पूर्व दिशा. मी म्हणजेच लोकशाही असं सुरू आहे. हे असंच सुरू राहिलं तर तुमचे आणि माझे अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे मोदी स्वस्थ बसणार नसल्याचं म्हणत पवारांनी मोदींवर घणाघाती टीका केली.