हवा तेज चलती है दिनकरराव… टोपी संभालो…उड जाएगा…; ठाकरे-शिंदे गटाची मोर्चावरून डायलॉगबाजी

| Updated on: Dec 18, 2022 | 12:17 PM

व्वा विद्या ताई चव्हाण... महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत शिल्लकसेनेच्या उपस्थितीत हिंदीत भाषण करतायत...मुंबईत मराठी बोलण्याची लाज वाटते का?

हवा तेज चलती है दिनकरराव... टोपी संभालो...उड जाएगा...; ठाकरे-शिंदे गटाची मोर्चावरून डायलॉगबाजी
हवा तेज चलती है दिनकरराव... टोपी संभालो...उड जाएगा...; ठाकरे-शिंदे गटाची मोर्चावरून डायलॉगबाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: महाविकास आघाडीने काल मुंबईत महामोर्चा पार पडला. या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, मोर्चावरून आता शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे डायलॉग ट्विट करत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेल्यानंतर मुंबईत गर्दी जमा होईल की नाही या भीतीपोटी उद्ध्वस्तसेनेने पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन मुंबईत मोर्चा काढला. काल नाशिकचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले. आता टार्गेट मुंबई… हवा तेज चलती है दिनकरराव… टोपी संभालो… उड जाएगा, असा सूचक इशारा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.

 

महाराष्ट्रातील वसूली सरकार गेल्यानंतर त्या सरकारमधले बोके आज महापुरूषांच्या आडून मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काढलेला आजचा मोर्चा हा मुंबईतली सत्ता टिकवण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न होता, अशी खोचक टीकाही म्हात्रे यांनी केली आहे.

व्वा विद्या ताई चव्हाण… महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत शिल्लकसेनेच्या उपस्थितीत हिंदीत भाषण करतायत…मुंबईत मराठी बोलण्याची लाज वाटते का?, असा सवाल करतानाच चला… काही का होईना.. महामोर्चाच्या निमित्ताने घरी बसलेले नेते सहकुटुंब “रस्त्यावर” आले…, असा चिमटाही त्यांनी काढला.

“महापुरुषांच्या” अवमानाविरोधात “महाविकास आघाडीच्या” “महाराष्ट्रातील” “महामोर्चात” स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा “महानेता” राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानाविरोधात “महाज्ञानी” संजय राऊत किंवा इतर नेते का बोलत नाहीत? की “महाविकासआघाडी” स्वातंत्र्यवीर सावरकर यांना “महापुरुष” मानत नाही?, असा संतप्त सवालही म्हात्रे यांनी केला आहे.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अग्निपथ सिनेमाचा आधार घेत शिंदे सरकारवर टीका केली आहे. एह कांचा, साला बंदूक भी दिखाता है और पीछे भी हटता है. पिछे नही हटने का कांचा. पिछे हटने से पुराना जमाना लौटकर नही आनेवाला है, असा शब्दात अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

 

शिंदे – फडणवीस सरकार कोत्या मनोवृत्तीचं आहे. कालच्या मोर्च्याचा त्यांनी धसका घेतलाय. मोर्चा नॅनो होता तर मग फडणवीस यांच्या घराची सुरक्षा का वाढवावी लागली? मोर्चात 1500 पोलीस का उतरवावे लागले? असा सवाल करतानाच मोर्चा मोठा झाला असं यांच्याकडून म्हटलं जाणार ही अपेक्षा आमची नाही, असा चिमटाही दानवे यांनी काढला.