लाखोंचं सोनं-चांदी, कोट्यवधींचे मुंबई आणि पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांच्या संपत्तीची माहिती समोर

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

लाखोंचं सोनं-चांदी, कोट्यवधींचे मुंबई आणि पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांच्या संपत्तीची माहिती समोर
अनिल देसाई
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 6:53 PM

शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिल देसाई यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपल्या संपत्तीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात अनिल देसाई यांच्या पत्नीच्या नावावर असणाऱ्या संपत्तीची देखील माहिती देण्यात आली आहे. तसेच अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर किती कोटींचं कर्ज आहे, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. देसाई यांनी आपल्याकडे सध्या किती रोख रक्कम आहे यापासून ते त्यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता याविषयी सविस्तर माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. अनिल देसाई यांच्याकडे 530 ग्रॅम सोनं आणि 2 हजार ग्रॅम चांदी आहे. या दोघांची किंमत 36 लाख 89 हजार 800 रुपये इतकी आहे.

अनिल देसाई यांच्या पत्नीकडे 2300 ग्रॅम सोनं आणि 5 ग्रॅम चांदी आहे. या दोघांची मिळून किंमत ही 1 कोटी 57 लाख 18 हजार रुपये इतकी आहे. अनिल देसाई यांच्या स्वतः कडे एकूण 3 कोटी 85 लाख 71 हजार 323 रुपये रक्कम आहे. तर पत्नीच्या नावे 2 कोटी 96 लाख 89 हजार 326 रुपये रक्कम आहे.

स्थावर मालमत्ता किती?

अनिल देसाईंच्या नावे असलेली एकूण स्थावर मालमत्ता ही 5 कोटी 68 लाख रुपये इतकी आहे. तर पत्नीच्या नावे असलेली एकूण स्थावर मालमत्ता ही 9 कोटी 12 लाख रुपये आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रीच कँडी येथील राहत्या घराचा समावेश आहे. हे घर अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. या घराची किंमत ही 5 कोटी 68 लाख रुपये इतकी आहे.

अनिल देसाई यांच्या पत्नीच्या नावे असलेला मुंबईतील फ्लॅटची किंमत ही 2 कोटी 61 लाख रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे पुण्यात असलेल्या फ्लॅटची किंमत ही 81 लाख 64 हजार रुपये इतकी आहे. अनिल देसाईंवर 76 लाख रुपयांचं कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 48 लाख रुपयांचं कर्ज आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.