राज्यात अवकाळी पावसाच्या सरी; कुठे-कुठे पाऊस बरसला?

Maharashtra Mumbai Dombivli Sangali Nanded Rain Update : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होतोय. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस होतोय. आजही राज्यात विविध ठिकाणी पाऊस झाला. मुंबईसह डोंबिवली, सांगली नांदेडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

राज्यात अवकाळी पावसाच्या सरी; कुठे-कुठे पाऊस बरसला?
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 7:32 PM

यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायेत. नवी मुबंईत पावसाला सुरवात झाली आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जुईनगर, बेलापूर, सानपाडा परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तिकडे पुणे शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झालीय.पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र 31 मे ला वेळेवर केरळात मान्सून दाखल होणार आहे.दिवसा उन्हाचा तडका आणि संध्याकाळच्या सत्रात पाऊस त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. डोंबिवलीतही पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट पाहायला मिळतोय. ढगाळ वातावरण असून रस्त्यावर वाऱ्यामुळे धुळीचं वातावरण आहे.

सांगलीत धो-धो

सांगली, मिरज शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोरदार अवकाळी पाऊस होतोय. सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. तर सांगली ,मिरज शहरासह परिसरामध्ये सकाळपासून उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे उखड्याने सांगलीकर हैराण झाले होते. अचानकपणे सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नांदेडमध्ये अवकाळी पाऊस

नांदेडमध्ये अवकाळी पावसाला सुरवात झालीय. मात्र या अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा आवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे फळ बागासह अन्य शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा परिसरात जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ज्वारी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेचे वृक्ष कोलमडले आहेत. धुपेश्वर मुक्ताईनगर रस्त्यावर विदर्भाला जाणारा रस्ता बंद झाला आहे.

सिंधुदुर्गात वाऱ्यासह पावसाची हजेरी

सिंधुदुर्गात भर दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी ,वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला.अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेकांची उडाली तारांबळ.तर बच्चे कंपनीने मात्र या पावसाचा मनमुराद आनंद घेतला.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.