“संजय राऊत हे दलाल आहेत; शिवसेनेच्या आमदाराने एकाच वाक्यात राऊतांचे विश्लेषण केले

| Updated on: May 23, 2023 | 5:31 PM

खासदार संजय राऊत हे एसीमघ्ये बसून नेते झाले आहेत आम्ही रस्त्यावर उतरून, जेलमध्ये जाऊन इथंपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करण्याची, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची आमच्यासारख्या सामन्य शिवसैनिकाला रस्त्यावरचीही लढाई माहिती आहे

संजय राऊत हे दलाल आहेत; शिवसेनेच्या आमदाराने एकाच वाक्यात राऊतांचे विश्लेषण केले
Follow us on

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर वारंवार हल्लाबोल केला जातो आहे. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर गद्दारीचा शिक्का मारत हे सरकार म्हणजे नियमबाह्य असल्याचा ठपका त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर टीका करत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या ज्या आमदार-खासदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर त्यांनी गद्दारीचा शिक्का मारला आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे वाकयुद्ध सुरुच आहे. तर आता आमदार संजय शिरसाठ यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गगार काढले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, शिवसेनेचे उजवे हात म्हणून मनोहर जोशी यांना ओळखलं जातं.

राज्यात शिवसेना वाढीमध्ये मनोहर जोशी यांचाच मोठा हात आहे. विरोधकांबरोबरही त्याचे चांगले संबध होते. त्यामुळे ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना असं म्हटले आहे.

संजय शिरसाठ यांनी मंत्रिमंडळाचा विस्ताराविषयी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री बोलले लवकरच होईल कारण त्यांनी सांगितले आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसच दर मंत्रिमंडळाता माझं नाव चर्चेत असतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय शिरसाठ यांनी मनोहर जोशी यांची आठवण सांगताना म्हणाले की, जोशी सरांना त्या दसरा मेळाव्यात स्टेजवरून जावं लागलं होत,

त्यांची तब्बेत ठिक नव्हती. शिवसेना प्रमुखांकडे ते गेले की त्यांच्याकडूनते होकार मिळवूनच यायचे. तर यावेळी संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत हे दलाल आहेत.

खासदार संजय राऊत हे एसीमघ्ये बसून नेते झाले आहेत आम्ही रस्त्यावर उतरून, जेलमध्ये जाऊन इथंपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करण्याची, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची आमच्यासारख्या सामन्य शिवसैनिकाला रस्त्यावरचीही लढाई माहिती आहे आणि प्रशासनातीलही.

यावेळी त्यांनी माजी खासदार चद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांना आता कोण विचारतय ते नुसते बोलत असतात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर घातल आहे