Eknath Shinde: ही तर फॅशन झालीय, पक्ष सोडून बाळासाहेबांच्या नावाचा जप करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर गटनेते चौधरींची टीका

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात नवनव्या घडोमोडी घडण्यास वेग आला आहे. अनेक घटना घडत असतानाच मंत्री आणि गटनेते पदावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना त्यांनी केलेल्या बंडखोरीवर ज्यावेळी त्यांच्या भूमिकेविषयी विचारण्यात आले त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी शिवसेना सोडली नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक (Balasaheb Thackeray) आहे असं सांगत […]

Eknath Shinde: ही तर फॅशन झालीय, पक्ष सोडून बाळासाहेबांच्या नावाचा जप करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर गटनेते चौधरींची टीका
शिवसैनिक आहे असं सांगण्याची फॅशनः अजय चौधरींची टीका
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:57 PM

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात नवनव्या घडोमोडी घडण्यास वेग आला आहे. अनेक घटना घडत असतानाच मंत्री आणि गटनेते पदावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना त्यांनी केलेल्या बंडखोरीवर ज्यावेळी त्यांच्या भूमिकेविषयी विचारण्यात आले त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी शिवसेना सोडली नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक (Balasaheb Thackeray) आहे असं सांगत त्यांनी आपली शिवसेनेविषयीची भूमिका माडंली होती. त्यानंतर कालच गटनेते पदी निवड झालेले अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी एकनाथ शिंदे यांच्या मी शिवसैनिक आहे या वक्तव्यावर त्यांनी मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, पक्ष सोडायचा आणि बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून सांगायचं अशी आता फॅशन झालेय अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निकाल लागल्यानंतर काही तासातच नॉट रिचेबल होत आपली बंडखोरी जाहीर केली.

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे

त्यानंतर आपल्यासोबत शिवसेनेपेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगत आपल्या बंडखोरीची भूमिका सांगितली तरी त्यांनी आपण शिवसेना सोडली नसून बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीनुसार हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत, आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यांच्या विचारांशी फारकत घेतली नाही असंही त्यांनी सांगितली. आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असं सांगत त्यांनी आपण शिवसैनिक असल्याचेच सांगितले होते. त्याच्या या वक्तव्यावर गटनेते अजय चौधरी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 शिवसैनिक असल्याची सांगण्याची फॅशन

गटनेत अजय चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाविषयी सांगताना एकनाथ शिंदे यांच्यासारखं सागंण्याची आता फॅशन आले आहे असं सागंत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक

शिवसैनिक यांच्याविषयी सांगताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिक असण्याविषयीही सांगितले त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना ज्या अस्तित्वात आली त्यावेळी उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, त्यामुळे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी श्रीफळ वाढवले त्यावेळी त्याचे पाणी उद्धव ठाकरे यांच्यावर पडले होते, त्यामुळे शिवसेनेतील सगळ्यात ज्येष्ठ सैनिक हे उद्धव ठाकरे आहेत असंही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला संघर्ष नवीन नाही

त्यांनी शिवसेनेला संघर्ष काय नवीन नाही शिवसेना संघर्ष करत शिवसेना उभी राहिली आहे असंही त्यांनी शिवसेनेच्या संघर्षाविषयी आपले मत व्यक्त केले.

अजय चौधरींसोबत बैठकीला  22 आमदार

आजच्या बैठकीवेळी आपल्यासोबत 22 आमदार बैठकीला उपस्थित होते. असंही त्यांनी यावेळी सांगितले. गटनेते पत्राविषयीही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही सगळ्या गोष्टी कायद्यानुसार केल्या आहेत. त्यानुसार आपल्याला कायदेशीर प्रक्रियेनुसारच आपल्याला उपाध्यक्ष यांनी निवडीचे पत्र दिले आहे असं सांगितले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.