मध्य रेल्वेवर सहा दिवसांचा मेगाब्लॉक, वेळापत्रक आत्ताच पाहून घ्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : मध्य रेल्वेने दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर आज 13 ते 18 डिसेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाहीत. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद करुन घेण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून […]

मध्य रेल्वेवर सहा दिवसांचा मेगाब्लॉक, वेळापत्रक आत्ताच पाहून घ्या
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वेने दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर आज 13 ते 18 डिसेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाहीत. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद करुन घेण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय.

पहिला ब्लॉक : 13, 14 डिसेंबर, अप-डाऊन मार्गावर. कालावधी : 12.50 मिनिटे ते पहाटे 5 वाजेपर्यंत.

परिणाम : गुरुवारी रात्री सीएसएमटी येथून 11.48 मिनिटांची कुर्ला लोकल आणि शुक्रवारी रात्री 12.31 मिनिटांची कुर्ला लोकल रद्द होणार

दुसरा ब्लॉक : 14, 15 डिसेंबर, अप आणि डाऊन मार्गावर. कालावधी : मध्यरात्री 12 ते पहाटे पाच वाजेपर्यंत

परिणाम – शुक्रवारी रात्री सीएसएमटी येथून 11.48 मिनिटांची कुर्ला लोकल आणि शुक्रवारी रात्री 12.31 मिनिटांची कुर्ला लोकल रद्द होणार. रविवारी कुर्ला स्थानकाहून सीएसएमटीसाठी रवाना होणारी 4.51 आणि 5.54 रद्द होणार.

तिसरा ब्लॉक : 15, 16 डिसेंबर, अप आणि डाऊन जलद मार्गावर. कालावधी : रात्री 11.15 ते पहाटे 6 आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री 12.15 ते 4.45.

परिणाम : शनिवारी रात्री 11 ते 12.30 या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून रवाना होतील. भुसावळ-सीएसएमटी-भुसावळ आणि पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द होणार.

चौथा ब्लॉक : 16, 17 डिसेंबर, अप-डाऊन जलद मार्गावर. कालावधी : रात्री 1.15 ते पहाटे 6 आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री 12.15 ते 4.45.

परिणाम : शनिवारी रात्री 11 ते 12.30 या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून रवाना होतील. कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पाचवा ब्लॉक : 17, 18 डिसेंबर, अप-डाऊन मार्गासह दादर टर्मिनसवर. कालावधी : रात्री 12.45 ते 4.30

परिणाम : सोमवारी रात्री कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात सोमवारी सीएसएमटीहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मंगळवारी ठाणे-कुर्ला येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.