APMC च्या फळ मार्केटमध्ये स्पेनचा हापूस, 10 आंब्यांची किंमत 4,500 रुपये

| Updated on: Oct 24, 2020 | 12:41 AM

सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेनचा हापूस दाखल झाला आहे.

APMC च्या फळ मार्केटमध्ये स्पेनचा हापूस, 10 आंब्यांची किंमत 4,500 रुपये
Follow us on

नवी मुंबई : कोरोना काळात सध्या प्रत्येकजण स्वतःच्या जीवाची काळजी करत आहे (Spain Hapus Mango). पौष्टिक आहार घेत असून रोजच्या आहारात फळांचा समावेश देखील करत आहेत. मात्र, सध्या इंपोर्टेड फळांकडे भारतीय लोकांचा कल जास्त आहे. भारतीय फळांपेक्षा विदेशी फळांना भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे विविध देशातून विक्रीसाठी फळे ही आयात केली जातात (Spain Hapus Mango).

सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेनचा हापूस दाखल झाला आहे. हा हापूस जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेलात, तर तुम्हाला 10 आंब्यांचे 4 हजार 500 रुपये मोजावे लागतील. याच प्रकारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वॅाशिंग्टन, साऊथ आफ्रिका, तुर्की, इराण, बेल्जीयम, चायना, कॅलिफोर्निया या सर्व देशातून फळांची आयात केली जाते. ज्यामध्ये स्पेनचा हापूस, किवी, पेर, ब्लु बेरी, द्राक्ष यांसारख्या बऱ्याच फळांचा समावेश असतो. मात्र, या फळांची किंमत ही त्याच प्रकारची असते अर्थात ही फळे अत्यंत महाग असतात.

सध्या बाजारात भारतीय सफरचंद मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विदेशी फळांच्या तुलनेत भारतीय फळे ही स्वस्त आणि चवीला उत्तम दर्जाचे असतात. तरीही काही प्रमाणात लोकांची इम्पोर्टेड फळांनाच मागणी असते. तसेच, सध्या फळ मार्केटमध्ये इंपोर्टेड सफरचंदाच्या तुलनेत भारतीय सफरचंदाची विक्री ही मोठ्या प्रमाणावत होत आहे.

Spain Hapus Mango

संबंधित बातम्या :

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दारात 30 रुपयांची घसरण, ग्राहकांना दिलासा