दिवा स्थानकावर आज विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर आज शनिवारी 16 फेब्रुवारीला रात्रीच्यावेळी पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. शनिवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते पहाटे 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल साडे पाच तासांचा हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान पुलाचे गर्डन टाकण्याचे […]

दिवा स्थानकावर आज विशेष पॉवर ब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर आज शनिवारी 16 फेब्रुवारीला रात्रीच्यावेळी पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. शनिवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते पहाटे 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल साडे पाच तासांचा हा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान पुलाचे गर्डन टाकण्याचे काम केले जाईल. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. या ब्लॉकमुळे 16 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी येणारी 50106 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. तर 50105 दिवा-सावंतवाडी ही पॅसेंजर गाडी रविवारी सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी पनवेल स्थानकातून सुटेल.

17 फेब्रुवारीला रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी 50119 दिवा-पनवेल पॅसेंजर आणि पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी सुटणारी 50120 पनवेल-दिवा पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान 12134 मंगळूरु जंक्शन-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी निश्चित वेळेच्या 50 मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होईल.

VIDEO :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.