Mumbai Pollution | मुंबईचं ‘हवा’मान बिघडलं?; क्वालिटी इंडेक्स काय सांगतो?

| Updated on: Jan 23, 2021 | 1:16 AM

असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. (Special Report About Mumbai Air Pollution)

Mumbai Pollution | मुंबईचं हवामान बिघडलं?; क्वालिटी इंडेक्स काय सांगतो?
Follow us on

मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ऐन थंडीत पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरणात थंडी, वाढलेली आर्द्रता अनुभवायला मिळत आहे. यासारख्या असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. (Special Report About Mumbai Air Pollution)

सफर ही हवेची गुणवत्ता दर्शवणारी संस्था आहे. ही संस्था मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्ता दर्शवते. या संस्थेने मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) मध्ये नववर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात वायू प्रदूषण वाढल्याची नोंद केली होती.

सफर या संस्थेने दर्शवलेल्या मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात संपूर्ण शहराचा एक्यूआय (AQI) 300 हून अधिक नोंदवण्यात आला. मुंबईतील कुलाबा, माझगाव, वरळी, वांद्रे, कुर्ला, मालाड, भांडूप, चेंबूर या ठिकाणी हवा वाईट असल्याची नोंद केली होती. यातील सर्वात प्रदूषित झालेल्या ठिकाणांमध्ये कुलाबा 332, मालाड 332, बीकेसी 336, बोरिवली 303 या ठिकाणी सर्वात वाईट हवा नोंदवण्यात आली. तर भांडूप 114, माझगाव 190, वरळी 121 या ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या हवेची नोंद करण्यात आली.

गेल्या महिनाभरातील मुंबई शहराचा एक्यूआय (AQI) डेटा

विशेष म्हणजे चेंबूर आणि नवी मुंबईतही वाईट दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सध्या मुंबई शहराचा एक्यूआय (AQI) 166 इतका आहे.

?सर्वाधिक वाईट हवा असलेली ठिकाणं?

नेरुळ – 308
बोरिवली – 133
सांताक्रूज – 157
कुर्ला – 167
मुंबई शहर – 111
पवई – 107
सायन – 171
विलेपार्ले – 156

(Special Report About Mumbai Air Pollution)

?मध्यम स्वरुपाची हवा?

वांद्रे – 55
मालाड – 91
वरळी – 99

गेल्या आठवड्यातील मुंबई शहराचा एक्यूआय (AQI) डेटा

प्रदूषण वाढीची कारणं काय?

काही दिवसांपूर्वी मुंबईत येणारे वारे हे पूर्वेकडून येत होते. त्यासोबत ह्युमुडिटी वाढली होती. त्यामुळे प्रदूषणाचे जे काही कण आहेत, ते त्या बाष्पावर बसतात आणि ते जड होतात. हे जड झालेले कण हे जमिनीलगतच राहतात.

सर्वसाधारण मुंबई किंवा इतर बेटांच्या शहरात तापमान हे sea breeze effect मुळे कंट्रोल होतं. sea breeze effect उशिराने झालं तर अजून तापमान वाढतं. हे तापमान वाढीची कारणं आहे.

गेले काही दिवस पूर्वेकडून येणारे strong वारे हे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना प्रतिकार करत होते. त्यामुळे तापमान कमी होण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे तापमान रात्रीच्या वेळी 17 ते 18 पर्यंत येण्याऐवजी 23 पर्यंत पोहोचतं. sea breeze लवकर संपत नसल्याने प्रदूषण समुद्रात शोषलं जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली. हे याचे प्रमुख कारण आहे, अशी माहिती भारतीय हवामान तज्ज्ञ शुभांगी भूते यांनी दिली.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

वायू प्रदूषणाचे परिणाम 

वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा वृद्ध आणि लहान मुलांवर होतो. तसेच हृदयरोग, श्वसनाचे रोग, कर्करोग यासारखे आजार असणाऱ्यांना वायू प्रदूषणाचा धोका जास्त असतो. त्याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांना खाज, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात.

त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणे, औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी चा समावेश करणेही गरजेचे आहे.

तसेच प्रदूषणादरम्यान गर्दीची ठिकाणे टाळा. घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. (Special Report About Mumbai Air Pollution)

संबंधित बातम्या : 

Mumbai Pollution | प्रदूषणाची पातळी वाढली, मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

Environment tips: प्रदूषण कमी करायचंय?, घरात शुद्ध हवा हवीय?, मग गॅलरीत ‘ही’ रोपं हवीच!