Mumbai Pollution | प्रदूषणाची पातळी वाढली, मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत 'हेल्थ अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Mumbai Pollution | प्रदूषणाची पातळी वाढली, मुंबईत 'हेल्थ अलर्ट' जारी

मुंबई : गेल्या आठवड्याभरात राज्यात पावसाळी वातावरण होतं. राज्यातील अनेक (Health Alert In Mumbai) भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, कालपासून राज्यातील तापमान बदलत आहे. मुंबईत कालपासून कोरडं वातावरण आणि तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे (Health Alert In Mumbai).

मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. सध्याचे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरी यांनी मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबईतील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यासोबतच हवेची गुणवत्ताही खालावली आहे. आज हवेचा गुणवत्ती निर्देशांक 170 इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत प्रदूषण वाढल्याने ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

‘लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी’

दमा, अस्थमा, हृदयविकार, मधुमेह इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे वातावरण घातक असल्याचं जोहरी यांनी सांगितलं. तसेच, लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे हवेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे धुलिकरण जमिनीलगत साचून राहिल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

मुंबईतील गुणवत्ती निर्देशांक 170 असून शनिवारी तो 179 पर्यंत पोहोचला होता. मुंबईतील हवेचा वेग मंदावला असून तो सध्या ताशी पाच किलोमीटरपेक्षाही कमी आहे.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

या आठवड्यातील वातावरण कसं असेल?

गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोवा क्षेत्र पावसामुळे जास्त प्रभावित झाले. मात्र, या आठवड्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज स्कायमीटर वेदरच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या आठवड्यात कोकण-गोवा पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल. गेल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्येही दिवसा आणि रात्रीदेखील तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअसने वाढलं होतं. या भागांध्ये दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दिशेने वारे वाहत होते. या वाऱ्यामध्ये आद्रतेची कमी होती. त्यामुळे तापमान वाढलं (Health Alert In Mumbai).

आता हवामानाचं रुप बदललं आहे. हवेचं देखील रुप बदलत आहे. उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातील वारे मैदानी क्षेत्रांतून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला राज्यातील उत्तरेकडील शहरांमध्ये थंडी वाढेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात तापमान कमी होईल आणि थंडी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 12, 13 आणि 14 जानेवारीला तापमान सामान्य होईल. तर काही भागांध्ये पारा खाली घसरण्याची शक्यता आहे.

Health Alert In Mumbai

संबंधित बातम्या :

Indoor Air Pollution | बाहेरच नाही तर घरातही प्रदूषण, ‘या’ कारणांमुळे वाढतं घरातील प्रदूषण

Weather Report | हवेत गारवा, पण, पाऊस नाही; वाचा राज्याचं संपूर्ण ‘हवामान’

कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा ते विदर्भ, पाऊस पडणार की जाणार? या आठवड्यातील वातावरणाची डिटेल माहिती

Published On - 11:58 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI