Indoor Air Pollution | बाहेरच नाही तर घरातही प्रदूषण, ‘या’ कारणांमुळे वाढतं घरातील प्रदूषण

दूषित हवेत श्वास घेतल्याने अस्थमा, डोळे आणि घशात जळजळ, श्वास घेण्यास त्रास इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घरातील प्रदूषण कशामुळे होतं हे जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं.

Indoor Air Pollution | बाहेरच नाही तर घरातही प्रदूषण, 'या' कारणांमुळे वाढतं घरातील प्रदूषण

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाोढत चाललं आहे (Indoor Air Pollution). दिल्लीची हवा दर दिवशी आणखी विषारी होत चालली आहे. आपल्याला असं वाटतं की फक्त धुरामुळे प्रदूषण वाढतं पण तसं नाही. तुमच्या घरातही प्रदूषण होतं. फक्त घरात धूर म्हणजेच स्मॉग दिसत नाही म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण बाहेरील प्रदूषणापेक्षा घरातील प्रदूषण अधिक हानिकारक असू शकतं (Indoor Air Pollution).

दूषित हवेत श्वास घेतल्याने अस्थमा, डोळे आणि घशात जळजळ, श्वास घेण्यास त्रास इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घरातील प्रदूषण कशामुळे होतं हे जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं.

स्वयंपाकघर

घरातील प्रदूषण वाढवण्यात तुमच्या स्वयंपाकघराचा सर्वात मोठा वाटा असतो. टॅफलोन कोटिंग भांड्यांमधून आणि गॅसमधून निघणारी विषारी हवा आरोग्यासाटी घातक ठरु शकते. यामुले तुम्हाला डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

थर्ड हँड स्मोक

फर्स्ट हँड और सेकंड हँड स्मोकिंग आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण थर्ड हँड स्मोकिंगही आरोग्यासाठी तितकीच घातक ठरु शकते. थर्ड हँड स्मोक हा सिगारेडमधून निघणारा तो धुर असतो जो कपडे, उश्या आणि घरातील इतर सामानांमध्ये असतो (Indoor Air Pollution).

कार्पेट

जरी तुमच्या घरचा कार्पेट जुना असेल किंवा नवीन दोन्ही वायू प्रदूषण वाढवण्याचं काम करतात. नवीन कार्पेटचं फॅब्रिक हे हानिकारक असतं. तर जुन्या कार्पेटच्या फॅब्रिकमध्ये अनेक प्रकारची धुळ, पॉल्युटंट असतात. अनेकदा कार्पेट स्वच्छ करत असताना डोकेदुखी, रॅशेस, डोळे आणि घशात जळजळ होते. या समस्यांपासून वाचण्यासाठी आठवड्यातून एकदा कार्पेट नक्की स्वच्छ करा.

साफ-सफाई करणारे प्रोडक्ट्स

साफ-सफाई करणारे प्रोडक्ट्स घर स्वच्छ ठेवण्यात तुमची मदत करतात. पण, या प्रोडक्ट्समध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आणि टॉक्सिक गॅस असतात. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नीट वाचूनच कुठलंही प्रोडक्ट खरेदी करा.

Indoor Air Pollution

संबंधित बातम्या :

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

Corona Virus | ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करा, कोरोनाला पळवा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI