AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

आपले दात चमकदार असावेत असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, कधीकधी आपण असे काही खातो ज्यामुळे आपल्या दातांवर डाग पडतात.

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!
पिवळे दात
| Updated on: Dec 08, 2020 | 12:06 PM
Share

मुंबई : आपण ज्या व्यक्तीला सुंदर समजतो, अशा कोणत्याही व्यक्तीची दात (Teeth) नसलेल्या किंवा पडलेल्या अवस्थेत कल्पना करुन पहा बरं! अवघड आहे ना? दात नसल्यामुळे ती व्यक्ती आपणास अगदीच कुरुप वाटू लागते. आले ना लक्षात दातांचे महत्त्व? आपल्या सौंदर्याच्या कल्पनांमध्ये आपण केस, त्वचा, ओठ, डोळे अशा सगळ्या अवयवांना विचारात घेतो, पण दातांना नाही. दातांचा तेवढा विचार, सौंदर्याच्या दृष्टीनं आपण करीत नाही. मात्र, सौंदर्याच्या कल्पनांमध्ये दातांचेही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे (Teeth Staining food and beverage should avoid on healthy teeth).

आपले दात चमकदार असावेत असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, कधीकधी आपण असे काही खातो ज्यामुळे आपल्या दातांवर डाग पडतात (Teeth Staining food) आणि दात खराब दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या खाण्यापिण्यामुळे आपल्या चमकदार दातांचे सौंदर्य खराब होते आणि कोणते पदार्थ टाळणे आवश्यक आहे….

चहा

चहा पिणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते. पण, दातांसाठी चहा चांगला मानला जात नाही. कॉफीच्या तुलनेत चहा दातांसाठी अधिक हानिकारक ठरतो. चहा दातांचे बाह्य आवरण अर्थात इनेमलसाठी चहा अतिशय नुकसानदायी ठरतो. ज्यामुळे दात कमकुवत होतात आणि पिवळे पडतात.

कँडीज

जर तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल आणि तुम्ही नेहमीच कँडी खात असाल तर, हे तुमच्या दातांसाठी चांगले नाही. कँडीजमुळे आपल्या जीभेचा रंग बदलतो आणि दातांवर डाग पडतात. जर आपण खूप कॅंडीज खात असाल तर, आपल्या या सवयीवर मर्यादा ठेवा.

एनर्जी ड्रिंक्स

अ‍ॅसिडयुक्त पदार्थ आणि पेय देखील दात खराब करतात. एनर्जी ड्रिंक देखील दातांचा बाह्य थर खराब करतात. म्हणूनच, व्यायाम अथवा कसरती दरम्यान एनर्जी ड्रिंकऐवजी पाणी प्यावे. यामुळे ऊर्जाही मिळेल आणि दातांचे नुकसानही होणार नाही (Teeth Staining food and beverage should avoid on healthy teeth).

फळे आणि बेरीज

काही विशिष्ट फळे आणि बेरीज् दातांचे सौंदर्य खराब करण्याचे काम करतात. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, चेरी अशा अनेक फळांमुळे दातांवर डाग पडतात. त्यामुळे अशी फळे थेट खाण्याऐवजी त्यांचा रस करून, तो प्या किंवा लहान तुकडे करून खा.

सॉस

सॉस खाण्यास खूप चवदार असतात, परंतु सोया सॉस आणि टोमॅटो सॉससारखे गडद रंगाचे सॉस दात खराब करू शकतात. यापासून दातांचे रक्षण करण्यासाठी, हलक्या रंगांचे आणि क्रीमयुक्त सॉस खाणे फायदेशीर ठरते. तसेच, हे सॉस खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करून, तोंड स्वच्छ धुवा.

कार्बोनेटेड पेये

सोडा, कोला आणि इतर मद्य दातासाठी हानीकारक आहेत. या कार्बोनेटेड पेयांमधील रसायनांमुळे दातांचा बाह्य थर खराब होतो. आणि यामुळे दात पिवळे पडून कमकुवत होतात (Teeth Staining food and beverage should avoid on healthy teeth).

खाल्ल्यानंतर ब्रश करा

जे पदार्थ खाल्यामुळे दातांवर डाग पडू शकतात, असे पदार्थ खाल्यानंतर किंवा मद्यपानानंतर तोंड स्वच्छ धुवा. यामुळे दातांवर डाग पडणार नाहीत. जर आपण अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खाल्ले असतील, ज्यामुळे दातांचे इनेमल खराब होऊ शकते. तर खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटांनी ब्रश करा.

स्ट्रॉचा वापर वापरा

सोडा, ज्यूस आणि आईस टी सारख्या द्रव पदार्थ पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर वापरा करा. यामुळे, ते पदार्थ थेट दातांना स्पर्श न करता आपल्या तोंडात जातील आणि त्यामुळे दातांना इजा होणार नाही.

जास्तवेळ न चघळता पटकन गिळा

डागयुक्त पदार्थ आणि पेय बराच वेळ तोंडात चघळू नका. ते पटकन गिळून टाका. यामुळे दात डाग पडणार नाहीत. अन्न खाणे आणि ते नीट चावून खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, अशा दात खराब करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे चांगले.

(Teeth Staining food and beverage should avoid on healthy teeth)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.