Corona Virus | ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करा, कोरोनाला पळवा!

कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करावं, असा निष्कर्ष समोर आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:17 PM, 4 Dec 2020

मुंबई : कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवणं फार गरजेचं झालं आहे. कोरोना होऊ नये म्हणून सगळेच जण रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे लक्ष देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जण न चुकता काढा पीत आहेत. अशातच अभ्यासाअंती कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करावं, असा निष्कर्ष समोर आला आहे. (Chocolate grapes and green tea boost the immunity to fight Corona Virus)

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देशांमध्ये तर दुसरी लाट आली आहे. यामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण देखील वाढलं आहे. दुसरीकडे कोरोना लसीवर शास्त्रज्ञांचं जोरात काम सुरु आहे. याशिवाय कोरोनाला कसं रोखलं जाऊ शकतं, याचा अभ्यास संशोधन संस्था करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन बळ देऊ शकते, असं अभ्यासातून पुढे आलं आहे.

ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षामधील केमिकल कोरोना एंझायम (सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य) ब्लॉक करते ज्याच्यापासून कोरोना पसरतो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्रोटीज इंझायमच्या मदतीने कोरोना पसरतो. जर हेच द्रव्य आपण शरीरात पसरणं थांबवलं तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

औषधी वनस्पतींपासून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न

कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. औषधी वनस्पतींपासून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ज्ञ डी. यू. शी यांनी सांगितलं की, “आम्ही औषधी वनस्पतींवर संशोधन करीत आहोत, ज्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते”.

एम प्रो एंझायम कोरोना वाढवण्याचे काम करते. जर याच एंझायम प्रभाव कमी झाला तर कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल. ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षामध्ये असे केमिकल आहेत की जे एम प्रो एंजाइमला रोखू शकते.

‘ग्रीन टी’मध्ये असलेल्या केमिकलचा परिणाम एम प्रो एंझायमवर पडत असल्याचं अभ्यासाअंती पुढे आलं आहे. त्यामुळे ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करावं ज्यामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असं शास्त्रज्ज्ञांचं म्हणणं आहे.

(Chocolate grapes and green tea boost the immunity to fight Corona Virus)

संबंधित बातम्या

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती