SRPF जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

| Updated on: May 12, 2021 | 6:27 PM

एसआरपीएफ जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SRPF जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश
एसआरपीएफ जवानांच्या बदलीबाबत मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश
Follow us on

मुंबई : राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. (15-year condition for transfer to district police force for SRPF personnel canceled)

या निर्णयासाठी ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.

जागतिक पातळीवरुन लस खरेदीसाठी आदित्य ठाकरेंच्या सूचना

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होतोय. मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. तशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांमध्ये लसीकरणास परवानगी, नियम काय?

राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

15-year condition for transfer to district police force for SRPF personnel canceled