दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल राज्याचा 92.09 टक्के लागला. या निकालात दहिसरच्या विद्यामंदिर शाळेने चांगलं यश मिळवलं आहे. इंग्रजी माध्यमिक विभागाचा निकाल 100% तर मराठी माध्यमाचा निकाल 97.87 टक्के लागला आहे. विद्यामंदिर शाळेने पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन केलं आहे.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश
दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 08, 2026 | 3:11 PM

मुंबईत दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या विद्या मंदिर शाळेने यंदाही दहावीच्या बोर्ड परीक्षेत कमाल केली आहे. या शाळेने यंदाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या ‘विद्या मंदिर’ इंग्रजी माध्यमिक विभागाचा निकाल 100 टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल 97.87 टक्के लागला आहे. यंदाही शाळेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यामंदिर शाळेने सामान्यांची असामान्य शाळा’ ही बिरुदावली पुन्हा एकदा सार्थ करून दाखविली. शाळेच्या या उत्तुंग यश म्हणजे दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अविरत प्रयत्नांचं फळ आहे. त्याला विद्यार्थ्यांनी तशीच साथ दिली आणि शाळेचा नावलौकिक कायम ठेवला.

राज्यात 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान झालेल्या शालांत परीक्षा पार पडली होती.  या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये विद्या मंदिरच्या तनिसी चंदन साखळकर 97.40 टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर प्रणव प्रसाद पाध्ये 97.20 टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर सुमित सालदुरकर 95.20 टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.

विद्या मंदिर शाळेच्या मराठी माध्यमाच्या साजिरी उमेश प्रभू हिने 96.60 टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तेजस्विनी दिलीप खताळ 93.80 टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक, तर ऐश्वर्या रुपेश परब आणि अंतरा हर्षद तांबे यांनी 92.80 टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. हर्षदा तांबे या कर्णबधीर विद्यार्थिनीने आपल्या दिव्यांगात्वावर मात करीत अथक प्रयत्नाने यशाचे शिखर गाठले.

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर असलेल्या विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक समितीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना चांगलं सहकार्य लाभते, असं शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं.  पालकांनी शाळेच्या देदिप्यमान यशाचं कौतुक केलं आहे. शाळेने उत्तुंग यशाची परंपरा कायम राखल्याने परिसरात शाळेचे कौतुक होत आहे.

Follow Us