Sunetra Pawar Gungi Gudiya Row : काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल

काँग्रेसने सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' संबोधल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत हा महिला नेतृत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. इंद

Sunetra Pawar Gungi Gudiya Row : काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल
sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:58 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून हिणवलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना डिवचलं आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा खोचक सवाल काँग्रसने केला आहे. काँग्रेसच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. काँग्रेसच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हा समाचार घेतानाच काँग्रेसला जुन्या इतिहासाचीही आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आपला इतिहास विसरली का? असा प्रश्न आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना देखील गुंगी गुडिया बोलले जात होतं. गुंगी गुडिया बोलणं हा महिला नेतृत्वाचा अपमान आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us