मोठी बातमी ! ठाकरे गटाचे 12 आमदार आमच्या संपर्कात, गजानन कीर्तिकर यांचा दावा; ठाकरे गट पुन्हा फुटणार?

| Updated on: Jun 01, 2023 | 6:32 AM

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विशेष सहाय्य निधीतून अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेअर शाळेच्या आवारात शेड उभारण्यात आले होते. या शेडचे लोकार्पण कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे 12 आमदार आमच्या संपर्कात, गजानन कीर्तिकर यांचा दावा; ठाकरे गट पुन्हा फुटणार?
gajanan kirtikar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिंदे गटाचे खासदार आणि आमदारा आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी खोडून काढला आहे. उलट ठाकरे गटाचे 12 आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गजानन कीर्तिकर हे मीडियाशी संवाद साधत होते. उलट त्यांच्याकडे जे 15 आमदार आहेत, 5 खासदार आहेत त्यातील पाच पैकी तीन ते चार लोक तर नाहीच.. त्यातील दोन ते तीन लोक आहेत, त्यांची नाव घेणार नाही, पण ते अजिबात येणार नाहीत, ते मोठे लाभार्थी आहेत. 15 पैकी दोन ते तीन लाभार्थी आहेत ते आमच्या सोबत येणार नाहीत. मात्र 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आघाडी संपेल

गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणूक मी लढवेल की नाही मला माहीत नाही. लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने अमोलला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी टीकेल की नाही हे सांगता येत नाही, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. काही महिन्यांनी आघाडीच संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

तसं म्हणायचं नव्हतं

भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या विधानावरून कीर्तिकर यांनी यू टर्न घेतला. भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युती नव्हती महाविकास आघाडी होती. शिंदे साहेबांनी उठाव करून ती युती प्रस्तावित केली.

पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही एनडीए चे घटकपक्ष म्हणून खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नोव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. तो जो फरक आहे. त्याठिकणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळला की नाही? की आम्ही आहे तिथेच समजतात की काय? हा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता, असं त्यांनी सांगितलं.