सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, त्रिपुऱ्यातून मोठी बातमी

| Updated on: Mar 25, 2023 | 10:42 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून येणं बाकी आहे. त्या निकालाआधीच शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, त्रिपुऱ्यातून मोठी बातमी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झालीय. निकाल कधीही येऊ शकतो. पण गेल्या नऊ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देण्याचं जे सत्र सुरु केलंय ते अद्यापही चालूच आहे. एकनाथ शिंदे यांनी आधी ठाण्याचा गड ठाकरे गटाच्या हातून काबीज केला. ठाणे महापालिकेचे काही नगरसेवक वगळता इतर सर्वच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. 40 आमदार आणि अनेक खासदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर शिंदे यांनी नाशिकमधील सर्व कार्यकर्त्ये आपल्याकडे वळवले. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांचं हे धक्कातंत्र सुरुच आहे.

एकनाथ शिंदे यांनी आता तर थेट राष्ट्रीय पातळीवर ठाकरे गटाला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. त्याची सुरवात एकनाथ शिंदे यांनी थेट त्रिपुऱ्यातून केली आहे. त्रिपुऱ्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण ठाकरे गटाला हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा धक्का मानला जातोय.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय कार्यकारिणी देशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. पण एका राज्याच्या प्रदेशाध्यक्षानेच राजीनामा देवून शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलाय. या महत्त्वाच्या घडामोडनंतर राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळतो की ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळतो हे समोर येईलच. पण हा निकाल येण्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद याचे शिवसेना पक्षात नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले आहे.