Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे एकनाथ राहावं, ‘ऐक’नाथ होऊ नये; धनंजय मुंडेंची खोचक टीका

या राज्यात मुख्यमंत्री निवडायचा आहे. सर्वांचा हातात बॅलेट दिलं तर मुख्यमंत्री कोण होईल, असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावे, ऐकनाथ होऊ नये, असा खोचट टोला लगावला.

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे एकनाथ राहावं, ऐकनाथ होऊ नये; धनंजय मुंडेंची खोचक टीका
धनंजय मुंडेंची खोचक टीका
| Updated on: Aug 22, 2022 | 7:51 PM

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे ( Maharashtra) एकनाथ राहावं, ‘ऐक’नाथ होऊ नये अशी खोचट टीका धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली. धनंज मुंडे म्हणाले, एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री (Urban Development Minister) होते. तेव्हा निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय काय घेतला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावं ऐकनात होऊ नये, ऐकण्यात होण्यामुळे घेतलेले निर्णय स्वतला बदलावे लागतात, अशी वेळ येते. एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. नगराध्यक्ष ( Mayor) जनतेतून निवडून येणार आहे. पण, या निर्णयामुळं काही नगरसेवक नाराज झाले. ते म्हणाले शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण, आम्हाला तशी संधी आली असती ती का गमावली. हा नगरसेवकांत राग आहे.

नगरसेवकांत राग कसा

धनंजय मुंडे म्हणाले, रिक्षावाला मुख्यमंत्री झाले म्हणून नगरसेवक खुश होते. परंतु, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून येईल, असा निर्णय घेतला. त्यामुळं नगरसेवकांत शिंदे यांच्याबदद्ल नाराजी आहे. शिंदे यांनी स्वतः 40 जणांना सोबत घेऊन मुख्यमंत्री पद भूषविलं. परंतु, नगरसेवकांना अशी संधी आली तर ते काय करतील. मुख्यमंत्र्यांचं नाव एकनाथ आहे. ते आता महाराष्ट्रचे नाथ आहेत. या राज्यात मुख्यमंत्री निवडायचा आहे. सर्वांचा हातात बॅलेट दिलं तर मुख्यमंत्री कोण होईल, असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावे, ऐकनाथ होऊ नये, असा खोचट टोला लगावला.

कुंटे यांनाही मुंडेंनी डिवचलं

धनंजय मुंडे म्हणाले, डॉ. कुटे यांनी भाषण केलं. सत्तांतराची परिस्थिती होती. तेव्हा सर्वांना बघत होतो. तेव्हा कुटे सुरतेला गेले. सुरतेहून गुवाहाटीला गेले. तिथून गोव्याला आले. गोव्याहून महाराष्ट्रात आहे. पण, त्यांच्या वाट्याला काही आलं नाही. त्यांच्या मनातील खंत मी ओळखत असल्याचं म्हणून कुटे यांनाही मुंडे यांनी डिवचलं. खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा आणे अशी परिस्थिती असल्याचं ते म्हणाले.

शिंदेंचाही विरोधकांना मिश्किल टोला

देवेंद्रजी और मैं साथ साथ. मेरा भी नाम एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानं सभागृहात एकच हशा पिकला. एकनाथ शिंदेंनी विरोधकांना मिश्किल टोला लगावला. मुंडे यांच्यावर फडणवीस यांनी प्रेम, करुणा दाखविली, असं सभागृहात सांगितलं. तेव्हाही सभागृहात करुणा या शब्दावरून हशा पिकला.