Eknath Shinde: सक्षम नसतो तर एवढा मोठा ‘कार्यक्रम’ केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोला

Eknath Shinde : जनतेतून निवडून द्या, जनतेतून निवडून द्या, असं अजितदादा तुम्ही म्हणत होतात. एखादा पैसेवाला असेल दादागिरी करणारा असेल तर तो एखाद्या वॉर्डात परिणाम करेल. पण अख्ख्या शहरात करू शकत नाही. हे पुरोगामी राज्य आहे.

Eknath Shinde: सक्षम नसतो तर एवढा मोठा 'कार्यक्रम' केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोला
सक्षम नसतो तर एवढा मोठा 'कार्यक्रम' केला असता का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला टोलाImage Credit source: vidhansabha
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:53 PM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून आणण्याचं विधेयक विधानसभेत (vidhansabha) मांडलं. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खातं तुमच्याकडे होतं. तेव्हा तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच लोकांमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमच्याचकडे नगरविकास खाते आहे. तरीही तुम्ही तुमचाच निर्णय बदलत आहात. तुम्ही स्वत:च्या विचारावर निर्णय घ्या, असा हल्ला शिवसेनेने (shivsena) एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला. शिंदे यांनीही शिवसेनेच्या या हल्ल्याचा समाचार घेतला. मी सक्षम नसतो. तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, असा टोलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. शिंदे यांच्या या उत्तरामुळे सभागृहात एकच खसखस पिकली.

नगराध्यक्ष आणि सरपंचांना थेट लोकांमधून निवडून देण्याचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं. त्याला शिवसेनेसह विरोधकांनी आक्षेप घेतला. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तुम्ही स्वत:च्या विचाराने निर्णय घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं. तर, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. तेव्हा निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय काय घेतला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावं ऐकनात होऊ नये, ऐकनाथ होण्यामुळे घेतलेले निर्णय स्वत:ला बदलण्याची वेळ येते, अशी टीका मुंडे यांनी केली होती. या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ

मी कुणाचं ऐकतोय? मी जनतेचं ऐकतोय. आमचा अजेंडा काहीच नाही. जे जनता बोलेल तेच ऐकणार. त्यामुळे भास्करराव म्हणाले, तुम्ही स्वत:च्या विचारावर निर्णय घेतला पाहिजे. काम केलं पाहिजे. त्यांना सांगतो. काही काळजी करू नका. मी सक्षम आहे. देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ. त्यामुळे मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, असा टोला त्यांनी लगावला.

यापूर्वीही अनेकदा निर्णय बदलले

तुम्ही केलेल्या सूचनेचा आदर राखू. काही अडचणी असेल तर दूर करू. आम्ही गुवाहाटीला असताना सरकार अल्पमतात आलं. पटापट 400 जीआर काढले. त्यामुळे ते थांबवणार नाही का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. निर्णय आपण आताच बदलले नाही. जेव्हा एखादा निर्णय होतो. जेव्हा त्याचे फायदे तोटे लक्षात येतात. तेव्हा तो निर्णय बदलत असतो. नगरविकास विभागाने निर्णय घेतला म्हणजे तो नगरविकास मंत्र्याचा निर्णय नसतो. तो सामूहिक निर्णय असतो. सरकारचा निर्णय असतो. महाविकास आघाडीत आपण अनेक निर्णय बदलले. भाजप-सेना युतीचे निर्णय बदलले, असंही त्यांनी सांगितलं.

एखाद्या वॉर्डात घोडेबाजार होईल

जनतेतून निवडून द्या, जनतेतून निवडून द्या, असं अजितदादा तुम्ही म्हणत होतात. एखादा पैसेवाला असेल दादागिरी करणारा असेल तर तो एखाद्या वॉर्डात परिणाम करेल. पण अख्ख्या शहरात करू शकत नाही. हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे आव्हाड साहेब संपूर्ण शहरात परिणाम करू शकतो का? मुंब्र्यात दोनचार वॉर्डात तुम्ही करू शकता. संपूर्ण ठाणे शहरात आपण करू शकत नाही. कारण याचा अर्थ सरळ आहे की, त्या शहरातील मतदार मतदान करत असतात. एका वॉर्डात घोडेबाजार होऊ शकतो. संपूर्ण शहरात होऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.