Nurses Protest : परिचारिकांच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक, कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

| Updated on: May 31, 2022 | 6:18 PM

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत या 12 मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले.

Nurses Protest : परिचारिकांच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक, कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन
परिचारिकांच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक
Image Credit source: TV9 Marathi You Tube
Follow us on

मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकां (Nurses)नी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन (Protest) सुरु केले आहे. राज्यातील परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन (Appeal) वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत आणि या संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत मंत्रालयात चर्चा केली. यावेळी वैद्यकीय‍ शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

परिचारिकांच्या 12 मागण्यांबाबत शासन सकारात्मक

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत या 12 मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले. तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर घेतले जातील असे नमूद केले. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत याबाबत पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे यावेळी सांगितले.

विविध मागण्यासाठी 26 मे पासून परिचारिकांचं आंदोलन सुरु

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिकांचं 26 मे 2022 पासून कामबंद आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून 20 हजार नर्स या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तोंडी आश्वासन महत्त्वाचं नसून लेखी आश्वासनासह त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करत परिचारिकांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला होता. परिचारिकांच्या आंदोलनाचा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर झाला आहे. तोडगा न निघाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा परिचारिंकांनी दिला होता. पद रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने हे आनंदोलन पुकारले असल्याचे परिचारिकांनी सांगितले. (The Department of Medical Education is positive about the demands of nurses)

हे सुद्धा वाचा