दसरा मेळाव्याची रणनीती ठरली, अनिल परब यांनी सविस्तर सांगितलं

| Updated on: Sep 29, 2022 | 9:59 PM

कुठलंही गालबोट लागू देऊ नका. या उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचं पालन केलं जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलं.

दसरा मेळाव्याची रणनीती ठरली, अनिल परब यांनी सविस्तर सांगितलं
अनिल परब यांनी सविस्तर सांगितलं
Image Credit source: t v 9
Follow us on

Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : ट्रॅफिक सहआयुक्त, सर्व पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ यांची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दसरा मेळाव्यात (Dussehra Melawa) पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ही बैठक घेतली आहे. पोलिसांना अपेक्षित त्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं. सभेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांशी एकत्र काम करून सभा यशस्वी करायची आहे, अशी माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली.

शिस्तीत होणार दसरा मेळावा

अनिल परब म्हणाले, शिस्तीत मेळावा व्हावा. वाहतुकीचे कोणते निर्बंध असायला पाहिजे. कुठल्या वाहतूक स्थळावरून लोकांना सभेच्या ठिकाणी येता येईल, याचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींची चर्चा आज झाली आहे.

मुंबईतील लोकं कसे येतील, बाहेरील लोकं कसे येतील, या सगळ्यांचं सविस्तर नियोजन हे पोलिसांबरोबर झालंय. त्यावर काम सुरू होईल.

गालबोट लागता कामा नये

दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाजी पार्कवर कोर्टानं मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा सोहळा दिमाखदार पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. पण, कुठलंही गालबोट लागता कामा नये, असं सांगितलं.

कायद्याचा भंग होणार नाही

आमच्याकडून कुठल्याही प्रकारे कायद्याचा भंग होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. मैदान भरून लोकं बाहेर उभे राहतील, अशी गर्दी राहील. कुठून लोकं येतील. कुठूनं जातील, याची चर्चा झाली आहे. त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शांततेत या. जल्लोष करा. पण, कुठलंही गालबोट लागू देऊ नका. या उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचं पालन केलं जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलं.