AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ही करप्ट प्रॅक्टिस, निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची? उद्धव ठाकरेंचा रोकडा सवाल

Uddhav Thackeray on Election Commission : गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगासोबत सुरू असलेली चर्चेची फेरी विरोधी शिष्टमंडळाने आज पूर्ण केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आयोगाला रोकडा सवाल केला.

Uddhav Thackeray : ही करप्ट प्रॅक्टिस, निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची? उद्धव ठाकरेंचा रोकडा सवाल
उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 15, 2025 | 4:01 PM
Share

मतदान यादीतील घोळावर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी शिष्टमंडळाने टीकेची झोड उठवली. राज्य निवडणूक आयोगासोबत गेल्या दोन दिवसांपासून शिष्टमंडळाने चर्चेची फेरी केली. पण आयोगाच्या उत्तराने शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेते आयोगाच्या एकूणच भूमिकेवर नेत्यांनी चांगलाच आसूड ओढला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांच्या भेदक प्रश्नांमुळे आयोगाची भांबेरी उडाल्याचे समोर आले.

ही आयोगाची करप्ट प्रॅक्टिस

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का. आता जो खेळ सुरू आहे. खोटा कारभार सुरू आहे. म्हणूनच म्हटलंय निवडणुका घेऊ नका. हा घोळ दुरुस्त करा. निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित निवडणूक पार पाडणं आहे. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. करप्ट प्रॅक्टिस म्हणून. म्हणून आम्ही म्हणतो ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा त्यांचा भ्रष्टाचार आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क हिरावला होता. आता निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची, असा सवाल त्यांनी केला.

भाजपला सोबत येण्याचे आवाहन

भाजपची यात ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं, असं आवाहन त्यांनी भाजपला केले. हा सर्वच पक्षांचा विषय असल्याचे ते म्हणाले. मतदान यादीतील घोळावर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी ताशेरे ओढले. निवडणूक आयोग उत्तरच देत नसल्याचे आणि अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

अमूक तारखेच्या आधी निवडणुका घेतल्या पाहिजे असं काही आयोगाचं म्हणणं नाही. आयुक्त म्हणाले, सकारात्मक विचार करतोय. आम्ही म्हटलं विचार करून चालणार नाही. या गोष्टी होता कामा नये. जे मतदार हयात आहेत. त्यांचा अधिकार हिरावून घेतला. त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएमवर आमचा आक्षेप आहे. महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवर होणार आहे. पण व्हीव्हीपॅट राहणार नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग देणार नाही. त्यामुळे आम्ही हुकूमशाही मान्य करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...