Raj Thackeray : कोणी कोणाले काढले तेच कळत नाही, मतदार यादीतील घोळावर राज टोला, ठाकरेंचे गंभीर आरोप काय?
Raj Thackeray on State Election Commission : 2024 मधील विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतील घोळावर विरोधी शिष्टमंडळाने आसूड ओढले. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. त्यावर निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.

2024 मधील विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतील घोळावर विरोधी शिष्टमंडळाने आसूड ओढले. गेल्या दोन दिवसांपासून शिष्टमंडळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि आयुक्तांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. पण आयोगाच्या भूमिकेवर शिष्टमंडळाचं समाधान झालं नसल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांनी तर मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आयोगाचा खरमरीत समाचार घेतला.
वयावरून राज ठाकरेंचा टोला
२०२४च्या निवडणुका झाल्या तेव्हा यादी होती त्या यादीतील छोटाचा तपशील वाचून दाखवणार. २०२४च्या यादीतील काही नावं वाचून दाखवतो. म्हणजे यादीतील घोळ लक्षात येईल. चारकोप नंदिनी महेंद्र चव्हाण वय १२४, नाव महेंद्र श्रीनाथ चव्हाण वय ४३ कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाहीये असा खरमरीत टोला राज ठाकरे यांनी हाणला. यादीतील वडिलांचे आणि मुलांच्या वयातील फरकावर त्यांनी नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या या आरोपांना राज्य निवडणूक आयोगाने दाखल्यासह उत्तरं देणे गरजेचे आहे.
यादीतील घोळांची जंत्री
यावेळी राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळांची जंत्री वाचून दाखवली. हा २०२४च्या निवडणुकी आधीचा घोळ. २०२४ नंतर यादी दिली. त्यात फक्त नाव आहे. फोटो नाही. पत्ता नाही. काही नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला बोललो तर म्हणतात राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. राज्य आयोग म्हणतो केंद्राकडे येते. दोन्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहे. या याद्यात सुधारणा होत नाही. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सांगितलं. पालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर पाच वर्षात निवडणुका झाल्या नाही. पाच वर्ष यात गेली असली तरी याद्या सुधारण्यासाठी ६ महिने गेले तर काय फरक पडतो. याद्या सुधारल्याशिवाय याद्या घेऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
काल त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं ते रद्द करायला सांगितलं. निवडणुका घेऊ नका सांगितलं. उद्या ते काय करतात ते पाहू. त्यानंतर एक दोन दिवसाने भूमिका मांडू, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते आणि त्यानंतर विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ त्यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
