मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली

| Updated on: Jun 30, 2020 | 6:55 PM

मुंबईतील ताज हॉटेलला पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Threatening phone call from Pakistan to Mumbai Taj Hotel).

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली
हे आहे भारतातील हॉटेल जगातील सर्वात शक्तिशाली ब्रँड
Follow us on

मुंबई : मुंबईतील ताज हॉटेलला पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Threatening phone call from Pakistan to Mumbai Taj Hotel). अज्ञातांनी सोमवारी (29 जून) रात्री उशिरा हॉटेलमध्ये फोन करुन मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, अशी धमकी दिली. धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान, हा फोन कराचीतून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Threatening phone call from Pakistan to Mumbai Taj Hotel).

ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने आपलं स्वत:चं नाव ‘सुलतान’ असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आपण पाकिस्तानातून बोलतोय असंही तो म्हणाला. त्याने ताज हॉटेलमध्ये पुन्हा 26/11 सारखा हल्ला करु, अशी धमकी दिली.

हेही वाचा : चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

विशेष म्हणजे धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने हॉटेल कर्मचाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप नंबरदेखील दिला आहे. “तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी दिलेला व्हाट्सअ‍ॅप नंबर तपासा. मी पाकिस्तानहून बोलतोय याची तुम्हाला खात्री पटेल”, असं तो हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना म्हणाला.

“कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला अतिरेकी हल्ला सगळ्यांनी बघितला. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार”, असंदेखील तो फोनवर म्हणाला.

हेही वाचा : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात सात नवे रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. ताज हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यासोबतच संपूर्ण दक्षिण मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, धमकीच्या फोनची माहिती एटीएसलादेखील देण्यात आली आहे. याशिवाय गुप्तर यंत्रणांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. फोन खरच पाकिस्तानातूनच आला की, कुणी चेष्टा केली आहे, याचादेखील तपास पोलीस करत आहे.