Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणाला धक्कादायक वळण… पोलिसही चक्रावले… महिला गँगची दहशत, त्या तरुणीच्या अटकेने खळबळ

Tiger Shroff Firing Lady Gang : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. या प्रकरणात महिला गँगही सक्रिय असल्याची शक्यता समोर येत आहे. अजून एका तरुणीच्या अटकेने खळबळ उडाली आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणाला धक्कादायक वळण... पोलिसही चक्रावले... महिला गँगची दहशत, त्या तरुणीच्या अटकेने खळबळ
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणाला धक्कादायक वळण...
| Updated on: Nov 03, 2026 | 6:41 AM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर 18 ऑक्टोबर रोजी जुहू भागात गोळीबार झाला होता. चाहत्याच्या गराड्यात आलेल्या आरोपींनी त्याच्या बाजूने कारवर धडाधड गोळ्या चालवल्या. त्यात त्याच्यासह इतर दोघे जखमी झाले होते. मुंबई गुन्हे शाखेने तपास हाती घेतल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून प्रकरणात अजून एका 22 वर्षीय तरुणीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हरियाणा पोलिसांच्या मदतीने 1 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात महिला गँग सक्रिय असण्याची शक्यता समोर येत आहे. एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 13 वर पोहचली आहे.

तपासात धक्कादायक खुलासे

Loading...

याप्रकरणाचे राजस्थानमधील कोटा, दिल्ली आणि हरियाणातील सोनीपत येथील कनेक्शन समोर आले होते. आरोपी हे सोनीपत भागातील आहेत. आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला. याप्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरुणींची गुन्हेगारी क्षेत्रातील सक्रिय सहभाग हा आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्ये महिलांचा वापर वाढत असल्याचे याप्रकरणातून समोर आले आहे.

मुख्य हल्लेखोर

फुल सिंह, सोनीपत, हरियाणा

ऋतिक महतो उर्फ रोशन, बेगुसराय, बिहार

रेहान अन्सारी, सोनीपत

शस्त्र पुरवठा करणारे आरोपी

राधा वर्मा, उत्तर प्रदेश

बबिता राव, उत्तर प्रदेश

कुणाल जामिनसिंह, सोनीपत, हरियाणा

सुमित सरोलिया, सोनीपत, हरियाणा

अर्थ पुरवठा करणारे आरोपी

अंकित उर्फ सरपंच खटक, सोनीपत

समीर खत्री, सोनीपत

जतिन पांचाल, सोनीपत

प्रांजल ठकराल, इंदूर, मध्य प्रदेश

इतर दोघे आरोपी

अमन, सोनीपत

22 वर्षीय तरुणी, नाव जाहीर नाही, सोनीपत

विशेष म्हणजे याप्रकरणातील संशयित महिलांचा इतरही संघटित गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा कट कुठे आणि कसा रचण्यात आला. यामागील सूत्रधार कोण आहे याचा मुंबई गुन्हे शाखा सखोल तपास करत आहेत. मुंबई पोलिसांची पथकं अजूनही तपास करत आहेत. अनेक ठिकाणी छापासत्र सुरू असल्याचे तपासावरून समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us