Mumbai corona update : मुंबईत आजही कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, तब्बल 8 हजार 63 नवे रुग्ण

| Updated on: Jan 02, 2022 | 7:59 PM

आज मुंबईत (Mumbai) तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे.

Mumbai corona update : मुंबईत आजही कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, तब्बल 8 हजार 63 नवे रुग्ण
कोरोना प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

आज मुंबईत (Mumbai) तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे. यात एक दिवलासादायक बाबा म्हणजे आजही एकाही कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू झाला नाही. कोरोनाची दुसरी लाट धिरोदात्तपणे हाताळलण्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra ) तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित (Omicron)  रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. या दुहेरी संकटामुळे आता राज्य लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर असल्याचं मंत्र्यांकडून म्हटलं जातंय.

मुंबईने तब्बल 8 हजारांचा टप्पा पार केला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील रुग्णसंख्या 100 पर्यंत खाली आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागलीय. मुंबईतील रुग्णसंख्येनं 8 हजारांचा टप्पा देखील पार केलाय. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्ती आणि इमारतीमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशातून केलेला प्रवास, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याच समोर आलं आहे.

मुंबईतील गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्या

2 जानेवारी 8063
1 जानेवारी -6347
31 डिसेंबर – 5428
30 डिसेंबर – 3671
29 डिसेंबर – 2510
28 डिसेंबर – 1377
27 डिसेंबर – 809
26 डिसेंबर – 922
25 डिसेंबर – 757
24 डिसेंबर – 683
23 डिसेंबर – 602
22 डिसेंबर – 490
21 डिसेंबर – 327

या वाढलेल्या आकडेवारीच्या आलेखामुळे मुंबई शहर पुन्हा एकदा लॉनडाऊनच्या उंंरठ्यावर पोहोचले आहे. त्यामुळे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेला रोखणाऱ्या मुंबई पॅटर्नची जगभर चर्चा झाली होती. मात्र आता तिसऱ्या लाटेला रोखण्याचे आवाहन प्रशासनापुढे असणार आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, सरकारी ताफ्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर; आदित्य ठाकरे यांची घोषणा

भाईचारा बना रहे! भारत आणि चीन सैनिकांचं एकमेकांना हॅपी न्यू ईयर, मिठाईही वाटली

पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात