TOP 9 Headlines | 30 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: Mar 30, 2022 | 5:59 PM

राज्यात नाणार रिफायनरीचा विषय पुन्हा चर्चेत आलाय. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. पटोलेंनी किमान समान कार्यक्रमचा आग्रह धरलाय.

TOP 9 Headlines | 30 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
व्हाटसअप बुलेटिन
Image Credit source: TV9
Follow us on
  1. काँग्रेसच्या 25 आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे मागितली भेटीची वेळ, ठाकरे सरकारची कामगिरी की काँग्रेसच्या मंत्र्यांशी समन्वयाचा प्रश्न, आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष, संपूर्ण बातमी तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची आठवण, दलित, ओबीसी समाजाच्या विकासासाठी काम करण्याची मागणी, वाचा सविस्तर
  2. नरेंद्र मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला, सहा महिन्यात दुसऱ्यांदा डीए वाढवला, राज्य सरकारकडून देखील महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, कर्मचाऱ्यांकडून स्वागत, वाचा सविस्तर 
  3. नाणारचा मुद्दा पुन्हा चर्चेत, रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान, बारसु सोलगाव परिसरातील ग्रामस्थ प्रकल्पाविरोधात आक्रमक, वाचा सविस्तर  तर, रिफायनरीसाठी बारसूत 13 हजार एकर जागा देण्याचा प्रस्ताव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, वाचा सविस्तर
  4. गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, प्रविण दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’ची मुंबईत घोषणाबाजी, भाजप कार्यालयाजवळ आंदोलन, वाचा सविस्तर तर, मुंबईत राजकारणाचा खो खो झाल्याची चर्चा, आपचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवर महाविकास आघाडी सरकारची कारवाई, प्रविण दरेकर नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, संपूर्ण बातमी
  5. मराठावाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके वाढणार, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांची नोंद, वाचा सविस्तर
  6. पेट्रोल, सीएनजी नव्हे हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन नितीन गडकरी थेट संसदेत दाखळ, ‘हायड्रोजन कार भारताचं भविष्य’ असल्याचं वक्तव्य, वाचा सविस्तर https://bit.ly/3Lnq5nO
  7. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले, मनीष सिसोदियांची ट्विटद्वारे माहिती, भाजपवर आरोप, वाचा सविस्तर
  8. पाकिस्तानात इमरान खान सरकारची गंच्छती अटळ, अविश्वास ठरावावरील मतदानापूर्वीचं ‘एमक्यूएमने’ सरकारचा पाठिंबा काढला, वाचा सविस्तर
  9. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज लढत, आरसीबीला पहिल्या विजयाची संधी, वाचा सविस्तर