मुंबई पुणे रेल्वे मार्गावर 30 नोव्हेंबरपर्यंत गाड्या रद्द, 70 जादा बससेची सोय

| Updated on: Oct 31, 2019 | 9:52 PM

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जतदरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार (Extra Buses between Mumbai Pune) आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळामार्फत 70 जादा बसेस सोडण्यात येणार आहे.

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर 30 नोव्हेंबरपर्यंत गाड्या रद्द, 70 जादा बससेची सोय
Follow us on

मुंबई : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जतदरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार (Extra Buses between Mumbai Pune) आहे. यामुळे येत्या 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळामार्फत 70 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या सर्व बसेस मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर चालवण्यात (Extra Buses between Mumbai Pune) येणार आहे.

यात शिवनेरी बस वाहतुकीचे मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी 278 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच 36 निम आराम वाहतुकीच्या फेऱ्याही मुंबई पुणे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे.

यासोबतच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणे मार्गावर जाणाऱ्या 290 फेऱ्या उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आता पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज 465 फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या ठाणे विभागाने 20, मुंबई विभागाने 15, पुणे विभागाने 15 बसेस सोडल्या आहेत. याशिवाय शिवनेरी बससेवेच्या 20 बसही सोडण्यात आल्या (Extra Buses between Mumbai Pune) आहेत.

त्यामुळे दररोज 70 जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाश्याच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.