सूर्यनारायण डुल्ला यांच्या अडचणीत वाढ? क्राईम ब्रँच जबाब नोंदवणार, आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणात मोठी अपडेट

IIT Mumbai student Sahil Wakode Case: आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्याप्रकरणी काल त्याच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला. तपास अधिकारी साहिलच्या मोबाईलमधून डेटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये साहिलच्या ChatGPT हिस्ट्रीचाही समावेश आहे. त्यातून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे .

सूर्यनारायण डुल्ला यांच्या अडचणीत वाढ? क्राईम ब्रँच जबाब नोंदवणार, आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणात मोठी अपडेट
आयआयटी पवई साहिल वाकोडे सूर्यनारायण डुल्ला
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 23, 2026 | 9:30 AM

कुष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : यवतमाळच्या साहिल वाकोडे या आयआयटी पवई मुंबई ते शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गळफास लावून जीवन संपवलं. त्याला जबाबदार असणाऱ्या सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली. अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन आयआयटीमध्ये मुलं प्रवेश घेतात. मात्र साहिल सारख्या इतर काही मुलांनीही जीवन संपवलं आहे. उच्चस्तरीय समितीकडून तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तर त्याचवेळी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्राध्यापक डुल्ला यांचा जबाब नोंदवणार

साहिलने आयआयटी मुंबईमध्ये शिकत असताना कोणती तक्रार दाखल केली होती का? आणि त्याने संस्थेच्या समुपदेशन केंद्राकडून कधी मदत मागितली होती का? हे देखील गुन्हे शाखा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, त्यांचा जबाब क्राईम ब्रँचचे तपास अधिकारी नोंदवतील. काल साहिल वाकोडे यांच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला.

साहिलच्या पालकांचा जबाब नोंदवला

आयआयटी मुंबई, पवई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखेने साहिलच्या पालकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान समोर आलेल्या अतिरिक्त माहितीवर स्पष्टीकरणासाठी साहिलच्या पालकांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. पोलिसांनी सांगितले की, साहिलच्या लॉक केलेल्या आयफोनची तांत्रिक तज्ञांच्या मदतीने तपासणी केली जात आहे. फोनमधून डिजिटल माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चॅटजीपीटी हिस्ट्री मिळवण्यासाठी आणि त्यासंबंधित दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस तांत्रिक तपासही करत आहेत.

साहिलने आयआयटी मुंबईमध्ये शिकत असताना कोणती तक्रार दाखल केली होती का? आणि त्याने संस्थेच्या समुपदेशन केंद्राकडून कधी मदत मागितली होती का? हे देखील गुन्हे शाखा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी, पोलीस आयआयटी मुंबईच्या एससी/एसटी सेल आणि विद्यार्थी समुपदेशन केंद्राला पत्र लिहिणार आहेत. दोन्ही संस्थांना साहिलशी संबंधित कोणत्याही पूर्वीच्या तक्रारी, अर्ज किंवा समुपदेशनाच्या नोंदींबद्दल माहिती मागितली जाईल.

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबीयांनी संस्थेतील काही प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. गुन्हे शाखा सध्या डिजिटल पुरावे, कुटुंबियांचे जबाब आणि संस्थेच्या नोंदी यांची जुळवाजुळव करून संपूर्ण घटनेबद्दल माहिती गोळा करत आहे.

आरोपीची चौकशी करावी

FIR नोंद केलेला आहे, कलमा प्रमाणे आरोपीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. माझ्या मुलाला खुप टॉर्चर करण्यात आलं त्यामुळे त्याने आत्महत्या केली. क्राईम ब्रांचने या सगळ्याची लवकरात लवकर चौकशी करावी. मी वरच्या जातीचा आणि तु खालच्या जातीचा आहेस. तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू असं ते माझ्या मुलाला धमकवत होते गिरीश केदारे आणि डुल्ला यांना अटक केली पाहिजे. मी १३ तारखेला आलो होतो तेव्हा त्यानी मला सांगितलं होतं. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. आयआयटी मुंबईत प्रवेश मिळणं मोठी गोष्ट आहे. थोडं सहन कर असा माझ्या मुलाला मी सल्ला दिला. माझ्या मुलाला जातिवाचक शिवीगाळ केली असं मुलानी मला सांगितलं. एकीकडे ते म्हणतात माझ्याकडे फुटेज आहेत. आणि दुसरीकडे जातीवाचक शिवीगाळ करत होते. सीसीटीव्ही काढा आणि बघा, असे आई सोनाली वाकोडे यांनी आरोप केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us