AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Mid day meal on Tukaram Mundhe radar: अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता राज्यातील अंगणवाड्या आल्या आहेत. त्या एका आदेशाने अनेकांची धाकधुक वाढली आहे. या गोष्टींची आता तपासणी होणार आहे. सणासुदीच्या काळात अन्न सुरक्षिततेसाठी FDAची विशेष तयारी,पुढील एक-दोन दिवसांत सणासुदीच्या काळासाठी विशेष आदेश जारी होणार आहे.

तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
तुकाराम मुंढे, शालेय पोषण आहार
| Updated on: Aug 26, 2026 | 6:33 PM
Share

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज मोहीम सुरूच आहे. आता अंगणवाड्या त्यांच्या रडारवर आल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहार, शालेय पोषण आहार, मिड-डे मिलकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्टदर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे समोर आले होते. भूंगे लागलेले कडधान्य, खिचडीत आळ्या आणि अस्वच्छतेच्या घटना समोर आल्या होत्या. या नवीन आदेशामुळे शालेय पोषण आहारात मापात पाप करणाऱ्यांचे धाबे दणाणार आहे.

आम्ही कोणालाही सोडत नाही

एका मुलाखतीदरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सध्याच्या कारवाईबाबत जी टीका होते त्याला उत्तर दिले आहे. आम्ही कोणालाही सोडत नाही. FDAकडून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कारवाईचा दावा त्यांनी केला. जवळपास दररोज तपासणी आणि कारवाईची माहिती माध्यमांना दिली जाते. कारवाईसोबत फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. सरकारी असो किंवा खासगी, FDAच्या कारवाईत कोणताही भेदभाव करण्यात येत नसल्याचे मुंढेंनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील कॅन्टीनचीही FDAकडून तपासणी करण्यात आले. यापूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनचीही तपासणी केल्याचं मुंढे यांनी सांगितलं. सरकारी आणि निमसरकारी मिळून ११५ हून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमभंग आढळलेल्या आस्थापनांवर सुधारणा नोटीस आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही सरकारी-निमसरकारी आस्थापनांचे परवानेही निलंबित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शालेय पोषण आहार रडारवर

आमच्या दृष्टीने सरकारी किंवा खासगी अशी वेगळी कॅटेगरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. FBO म्हणजे Food Business Operator असे आहे. नियम सर्वांसाठी समान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अंगणवाडी आणि मिड-डे मीलच्या व्यवस्थेवरही FDAचं लक्ष असल्याचे ते म्हणाले. अंगणवाडी, शाळांचे मिड-डे मील आणि सेंट्रल किचन्सचा तपासणीत समावेश आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात ८ ते १० सेंट्रल किचन्सची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सेंट्रल किचन्समधून अंगणवाडी आणि शाळांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने घेतले. तपासणीनंतर एका सेंट्रल किचनचा परवाना निलंबित करण्यात आला. महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये वर्षातून किमान दोन वेळा तपासणी करण्यात आली. दर महिन्याला किमान नमुने घेण्याचीही प्रक्रिया राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बॅलन्स्ड डायटरी स्कोप’च्या आदेशानंतर तपासणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. शाळा आणि अंगणवाड्यांची नियमित तपासणी FDA च्या टार्गेटमध्ये आधीच समाविष्ट आहे. अन्नाच्या गुणवत्तेबाबत सरकारी आस्थापनांनाही कोणतीही सूट नाही, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक