Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामतीचं महाभारत, पवारांमध्येच कृष्ण कोण?, पाहा व्हिडीओ

| Updated on: Mar 26, 2024 | 10:12 PM

बारातमीच्या लढाईता आता महाभारताच्या वादाची एन्ट्री झालीय. आधी युतीत असताना शिवसेना-भाजपात कौरव-पांडवांवरुन वाद रंगायचा, आता पवारांमध्येच कृष्ण कोण? यावरुन टीका होतायत. कृष्णाविरोधात भावकी एकवटली होती. असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांविरोधात गेलेल्या नातलगांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामतीचं महाभारत, पवारांमध्येच कृष्ण कोण?, पाहा व्हिडीओ
सुनेत्रा पवार, अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us on

बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढाईत आता दोन जावा-जावांमध्ये सामना रंगलाय. अजित पवारांच्या भूमिकेविरोधात आधी श्रीनिवास पवारांनी टीका केली. त्यानंतर शर्मिला पवारांनीही विरोध करत रामायण-महाभारताचं उदाहरण दिलं., त्यालाच सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलंय. यावर अप्रत्यक्षपणे उत्तर देताना सुनेत्रा पवारांनी म्हटलंय की, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं सुनेत्रा पवारांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय.

कोण कुणाच्या विरोधात आहे आणि कुणी कुणाला एकटं पाडलंय. यावरुन दोन्ही पवारांमध्ये वाद सुरु आहे. अजित पवार म्हणतात की आपल्या विरोधात सारे कुटुंब एकत्रित होतील., यावर रोहित पवार म्हणतात की कुटुंब आहे तिथंच होतं. तुम्हीच विरोधी भूमिका घेतली. सुनेत्रा पवारांचं मत आहे की कृष्णाविरोधातही भावकी एकवटली होती. तिकडे अजित पवारांच्या आत्या मात्र शरद पवारांना एकटं पाडलं म्हणून त्यांच्यासोबत आहेत.

पाहा व्हिडीओ:-

आधी युतीत असताना शिवसेना-भाजपात कौरव-पांडवांवरुन वाद रंगायचा, आता पवारांमध्येच कृष्ण कोण? यावरुन टीका होतायत. अजित पवार जेव्हा भाजपसोबत सत्तेत आले, तेव्हा ही कृष्णनीती आहे असं फडणवीसांनी भाजप समर्थकांना आश्वस्त केलं. अजित पवारांच्या फुटीनंतर श्रीनिवास पाटलांनी गोवर्धन पर्वत उचललेल्या कृष्णाचा किस्सा सांगितला. तिकडे पुरंदरात हे धर्मयुद्ध आहे म्हणत शिंदेंचे नेते शिवतारेंनी बंड पुकारलंय. आणि कृष्णाविरोधात सारी भावकी एकटवली होती. म्हणत सुनेत्रा पवारांनी पोस्ट टाकलीय आहे.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट?

सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर, वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.