राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, ऐन महापाकिला निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे, दरम्यान आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. मनिषा भगत यांनी 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.
या प्रसंगी मनिषा प्रधान यांनी, जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र, काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया दिली.
पक्षांतराला वेग
दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत, येत्या 23 डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
