Wine पिऊन गाडी चालवली तर बार दाखवणार की तुरूंग? यूझरच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांचंही गंमतीदार उत्तर…

| Updated on: Jan 29, 2022 | 12:17 PM

किराणा दुकान आणि सुपरमार्केट(Supr Market)मध्ये वाइन(Wine)ची खरेदी आणि विक्री करता येईल. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपा(BJP)नं विरोध केला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. आता संजय राऊत यांच्या या विधानावर शिवम वहिया (Shivam Vahia) नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना गंमतीनं विचारलं, मुंबई पोलिसांनीही त्याला गंमतीदार उत्तर दिलंय.

Wine पिऊन गाडी चालवली तर बार दाखवणार की तुरूंग? यूझरच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांचंही गंमतीदार उत्तर...
वाइन - प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

Maharashtra Wine Policy : सोशल मीडियावर कधी-कधी असं काही व्हायरल होतं, की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. मुंबई पोलिसांचं असंच एक ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. नुकतंच राज्य सरकारनं नवीन ‘वाइन पॉलिसी’ मंजूर केली आहे. याअंतर्गत आता किराणा दुकान आणि सुपरमार्केट(Supr Market)मध्ये वाइन(Wine)ची खरेदी आणि विक्री करता येईल. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपा(BJP)नं विरोध केला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संजय राऊत म्हणाले, की वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे. भाजपा फक्त विरोध करतं पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही.

यूझरचा मुंबई पोलिसांना प्रश्न

आता संजय राऊत यांच्या या विधानावर शिवम वहिया (Shivam Vahia) नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना गंमतीनं विचारलं, की मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की मला तुरुंगात टाकतील?

मुंबई पोलिसांचं गंमतीदार उत्तर

त्या व्यक्तीच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही मजेशीर उत्तर दिलं आहे. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं, की सर, आम्ही तुम्हाला ‘जबाबदार नागरिक’ म्हणून मद्यपान केल्यानंतर बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. यासोबतच मुंबई पोलिसांनी गंमतीत लिहिलं आहे, की जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचा पाहुणा बनावं लागेल.

मजेशीर कमेंट्स

सोशल मीडिया यूजर्सनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं ‘इज्जत से ले जायेंगे’ असं मजेशीरपणे लिहिलं आहे, तर दुसऱ्या यूझरनंही कमेंट करत मुंबई पोलिसांचं उत्तर अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरनं मुंबई पोलिसांबद्दल कमेंट करताना लिहिलं आहे, ‘बहुत खूब! क्या सेंस ऑफ ह्यूमर है! क्या आपने अपने ट्वीट्स लिखने के लिए किसी कॉमेडियन को हायर किया है?’.

भाजपच्या राज्यात तर घरपोच वाईनचं धोरण, अजित पवारांचा पलटवार, मध्य प्रदेशात कुठे कुठे परवानगी?

Darekar | कुटेंकडून बदल्यांचा बाजार मांडणारे खुलासे, ‘सामना’तून झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातंय; दरेकरांचा घणाघात!

घरातच वाईनचा साठा ठेवता येणार, बारही उडवता येणार; काय आहे भाजपच्या मध्यप्रदेशातील वाईन धोरण?