संपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी भिडे यांचा चाहता मोठा तरुणवर्ग आहे, त्यामुळे संभाजी भिडे यांच्या या भूमिकेनंतर तरुणाई आक्रमक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 28, 2022 | 6:29 PM

सांगली : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारने वाईन दुकानात (Wine in Store) आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी चौफेर टीकेची झोड उडवली आहे, सर्वात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्विट करत राज्य सरकारच्या या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला, त्यानतंर आता संभाजी भिडेही (Sambhaji Bhide) यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय चुकल्याचे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी मांडले आहे. राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वच स्तरातून या निर्णयावर टीका होत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें