फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात, जवानांसाठी का नाही?; पुलवामावरून दैनिक ‘सामना’तून हल्लाबोल

| Updated on: Apr 17, 2023 | 6:34 AM

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घोटाळ्यावरून धक्कादायक विधाने केली आहे. त्यामुळे भाजप चांगलेच अडचणीत आले आहे. या मुद्द्यावरून दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे.

फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात, जवानांसाठी का नाही?; पुलवामावरून दैनिक सामनातून हल्लाबोल
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पुलवामा हल्ल्याप्रकरणी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्यपाल मलिक यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजप सरकारच्या बेफिकिरीमुळेच हा हल्ला झाल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून दैनिक सामनातून भाजवर हल्ला चढवण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात. जवानांसाठी का होत नाही? असा सवाल करतानाच एखाद्या देशात तर या प्रकरणी संरक्षण मंत्री किंवा गृहमंत्र्यांचे कोर्ट मार्शलच केले असते, अशी जोरदार टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अग्रलेखातील आसूड जसेच्या तसे…

300 किलो ‘आरडीएक्स’ इतकी कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पुलवामापर्यंत पोहोचले कसे? 40 जवानांच्या निर्घृण हत्येस जबाबदार कोण? यामागचे सत्य बाहेर आले नाही, पण जम्मू-कश्मीरचे पुलवामावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्याचा स्फोट केला आणि तो स्फोट 300 किलो आरडीएक्सपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान मोदी यांचे कश्मीरकडे दुर्लक्ष होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे डोळेझाक केल्यामुळेच पुलवामा हल्ला झाला, असे मलिक यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

जम्मू-कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत आणि सत्य सांगितल्याबद्दल त्यांना ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’कडून लगेच निमंत्रण येऊ शकते. जसे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 40 जवानांची हत्या झाली. त्याचे फक्त राजकारण झाले. दुसऱ्या एखाद्या देशात अशा हत्यांबद्दल त्या देशाचे संरक्षणमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे ‘कोर्ट मार्शल’च केले असते, पण 40 जवानांच्या हत्येचे खापर ठरल्याप्रमाणे पाकिस्तानवर फोडून हे लोक गप्प बसले.

माजी राज्यपाल मलिक यांनी स्फोटांची मालिकाच घडवली, पण गोदी मीडियाने त्यास महत्त्व दिले नाही. असा खुलासा काँगेस राजवटीत एखाद्या माजी राज्यपालाने केला असता तर भाजपने एव्हाना भ्रष्टाचार आणि देशद्रोहाच्या नावाने थयथयाटच केला असता, पण मलिक यांच्या विधानांना स्थान देऊ नये अशा सूचना गेल्याने माध्यमांनी सत्याकडे डोळेझाक केली. स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांच्या पायाशी गहाण टाकल्याचा हा पुरावा आहे.

जवानांना पोहोचविण्यासाठी सरकारने विमान दिले नाही. म्हणजे जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे हे कारस्थान होते काय? विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी फोडलेल्या चाळीस-पन्नास आमदारांना या राज्यातून त्या राज्यात हलविण्यासाठी विमाने सहज उपलब्ध होतात, पण जवानांच्या सुरक्षेसाठी विमान मिळत नाही. यालाच सध्या देशभक्ती मानले जाते.

सत्यपाल मलिक यांची जम्मू-कश्मीरच्या राज्यपालपदी नेमणूक पंतप्रधान मोदी यांनीच केली होती. त्यामुळे मलिक हे विरोधी पक्षांचे पोपट आहेत असे बोलून वेळ मारता येणार नाही. गौतम अदानींच्या कारनाम्यांवर पंतप्रधान चूप आहेत. पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावरदेखील ते चूप आहेत. अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्दय़ांवर पंतप्रधान ‘चूप’ असतात. मौनात जाणे पसंत करतात. पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला आणि घोटाळ्यांचे समर्थन करते!