उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान, थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jan 23, 2023 | 8:05 PM

“दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही”, असं स्पष्ट विधान उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलंय.

उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान, थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा? नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीचं गेल्या काही दिवसांत आधीच निश्चित झालं होतं. फक्त याबाबतची अधिकृत घोषणा करणं राहिलं होतं. पण या युतीबद्दल आपल्या माहिती नसल्याचं, तसेच आपल्याला त्या भानगडीत जायचं नसल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज षण्मुखानंद येथे महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित मेळाव्यात एक महत्त्वाचं विधान केलंय. “दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही”, असं स्पष्ट विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा नेमका टोला कुणाला? असा प्रश्न उपस्थित होतोय.

“प्रकाश आंबेडकर आज आपल्यासोबत आले आहेत. काही वर्षांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा नातू एकत्र आल्याचं पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

“देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती अशी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

“मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.