Mumbai Metro : कोण कामदार, कोण नामदार? मुंबई मेट्रोचं उदघाटन होतानाही ठाकरे-फडणवीस समर्थकांचं ट्विटरवॉर

| Updated on: Apr 02, 2022 | 7:27 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 प्रकल्पाचं लोकार्पण काम करण्यात आलं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.

Mumbai Metro : कोण कामदार, कोण नामदार? मुंबई मेट्रोचं उदघाटन होतानाही ठाकरे-फडणवीस समर्थकांचं ट्विटरवॉर
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 प्रकल्पाचं लोकार्पण काम करण्यात आलं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आलं नव्हतं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. तर, देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं नसल्याचं संपूर्ण भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आमनेसामने आले. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचं मेट्रो प्रकल्पात कसं योगदान आहे. यासदंर्भात ट्विट करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी देखील ट्विटरवर उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

चित्रा वाघ यांचं ट्विट

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विटरव ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी जेव्हा जेव्हा मुंबई मेट्रो प्रकल्पाची चर्चा होईल तेव्हा या प्रकल्पाचे कर्ते करविते देवेंद्र फडणवीस यांचे नाव जरूर घेतले जाईल. फक्त मोडता घालणे एवढेच योगदान असून ही उदघाटन सोहळ्यात मिरवले अशी उद्धव ठाकरे यांचीही चर्चा होईल, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलं आहे.

अमोल मिटकरींचं ट्विट

देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत म्हणून दोन मेट्रो चे उद्घाटन राहिले नाही, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजितदादांनी यांनी ते करून दाखवले. भाजपच्या नेत्यांचा पोटशूळ वेगळाच आहे .शेवटी “मी पुन्हा येईल” ही भूमिका काळाने नाकारली. मेट्रो सुरु झाली, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

मुंबई मेट्रोचे मारेकरी कोण, मुंबई भाजपचा सवाल
मुंबई भाजपच्यावतीनं मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो प्रकल्पाला गती व चालना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देण्यात आली. मात्र, सुखकर प्रवासाचं भविष्य नाकर्तेपणामुळं आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळं कोणी दिरंगाईच्या चक्रात अडकवले आणि मेट्रोचे मारेकरी कोण असा सवाल मुंबई भाजपकडून करण्यात आला.

मुंबई भाजपचं ट्विट

भाजप समर्थकाचं ट्विट

रुचित पटेल या भाजप समर्थकानं मुंबई मेट्रो ही देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलेली भेट असल्याचं म्हटलं आहे. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांना कामदार म्हटलं गेलंय. तर, उद्धव ठाकरेंचा उल्लेख कामदार असा करण्यात आला आहे. अशा प्रकारची अनेक ट्विटस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

इतर बातम्या

cm uddhav thackeray: मुख्यमंत्री म्हणाले, दादा, तुमच्याकडे येण्याची गरज नाही, अजितदादा म्हणतात, हा भेदभाव बरा नाही

bullet train project: बुलेट ट्रेनचा उपयोग काय?, मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या; मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टवर पुन्हा टीका