Supriya Sule : उद्धव-राज युतीवर सुप्रिया सुळेंचे ते सूचक वक्तव्य एकदम चर्चेत, महाआघाडी टिकणार? केले मोठे भाकीत

Supriya Sule Big Statement : राज्यातील लोकांच्या मनात जे आहे, तेच होणार. आमच्या शिवसैनिकांत कोणतचा संभ्रम नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम नाही. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Supriya Sule : उद्धव-राज युतीवर सुप्रिया सुळेंचे ते सूचक वक्तव्य एकदम चर्चेत, महाआघाडी टिकणार? केले मोठे भाकीत
सुप्रिया सुळे यांचे ते विधान चर्चेत
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 07, 2025 | 11:00 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस, मराठी पुन्हा केंद्रस्थानी येण्याची समीकरणं सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व घडामोडीदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पण प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीविषयी आता तर्कवितर्क करण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन राजकीय समीकरणाकडे कसे पाहतात याविषयी राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया यानिमित्त समोर आली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांच्या नवीन वक्तव्याने हवा मिळाली आहे. आता थेट बातमीच देणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. तर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मत व्यक्त केले आहे. लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहेत. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे हे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

लोकांच्या मनात जे, तेच होणार

तर मनसे-सेनेच्या युतीची चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात जे आहे, तेच होणार. आमच्या शिवसैनिकांत कोणतचा संभ्रम नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम नाही. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही ठाकरे सातत्याने युतीविषयी सकारात्मक चर्चा करत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता संदेश नाही, थेट बातमी

आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही संदेश देणार नाही. आता थेट बातमीच देऊ असे मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी मुंबईसह राज्यातील कार्यकर्त्यांना वाटते. गेल्या एक महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा करत आहे. पण चर्चेचे हे गुऱ्हाळ काही केल्या थांबेना. त्यावर काल संजय राऊत यांनी सुद्धा लवकरच मोठी अपडेट कळण्याचे संकेत दिले आहेत.

Follow Us