Video: राणे म्हणजे राणेच, रोमानियाला ‘वुमानिया’ म्हणाले तर देशाची राजधानीही बदलून टाकली!

| Updated on: Mar 05, 2022 | 3:16 PM

नारायण राणे यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी भारतात परतल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी पोहोचले होते. नारायण राणे यांनी त्यावेळी

Video: राणे म्हणजे राणेच, रोमानियाला वुमानिया म्हणाले तर देशाची राजधानीही बदलून टाकली!
नारायण राणे यांच्याकडून रोमानियाचा वुमानिया असा उल्लेख
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत भारतात आणल जातं आहे. यूक्रेनमधील (Ukraine) विमान सेवा बंद असल्यानं भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गे नजीकच्या पोलंड, रोमानिया आणि हंगेरीत पोहोचवलं जात आहे. तिथून त्यांना विमानाद्वारे भारतात आणलं जात आहे. भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री उपस्थित राहत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे देखील मंगळवारी विद्यार्थ्यांच्या स्वागताला मुंबई विमानतळावर पोहोचले होते. नारायण राणेंनी विमातळावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रोमानियाचा आणि त्यांच्या राजधानीचा उल्लेख चुकीचा उल्लेख केला. नारायण राणे रोमानियाला वुमानिया म्हणाले. पुढे त्यांनी रोमानियाची राजधानी बुखारेस्टचा उल्लेख बुखारिया असा केला. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देखील दिलंय.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे यांनी विमानतळावर बोलताना रोमानियाला वुमानिया म्हटलं.” नजीकका जो देश था वुमानिया उस देश में बुखारिया करके जो कॅपिटल है वहा पे वो पहुचे और प्लेन पकडके इंडिया मुंबईमे आ गये. तिथली विमान वाहतूक बंद होती, ते जवळचा देश वुमानियामध्ये आले, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांच्या उल्लेखावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना टोला लगावल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला. अजित पवार यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांची आठवण काढून दिली. त्यावेळी ते म्हणाले की, कुणी काय बोलले आहे ते जुने व्हिडिओ काढून बघा म्हणजे कळेल असं म्हणत अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले

लोकसभेतही केरळ तामिळनाडूवरुन नारायण राणेंचा गोंधळ

केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला. तसेच कोरोनाकाळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन केले होते. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेले की, माननीय अध्यक्ष महोदय. कोरोनाच्या महामारीचा गेल्या दोन वर्षांत उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. काही सुरूही झाले. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 2 लाख 80 हजार कोटी रुपये कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योगांसाठी खर्च केले गेले, असे त्यांनी सांगितले. राणे पुढे म्हणाले की, नुकसान झालेल्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडूमध्येही अनेक उद्योजकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले. सबसिडी दिली. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जितके उद्योग होते ते पुन्हा एकदा सुरू झाले. मात्र, या उत्तरावर सभापती महोदयांनी हरकत घेतली. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर राणे ओशाळले. तिथेही त्यांनी गडबड केली. तर तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा उल्लेख केला. त्यानंतर सभापतींनी केरळ म्हणत त्यात पुन्हा सुधारणा केली आणि पुढला प्रश्न पटलावर घेतला.

इतर बातम्या :

नारायण राणे रोमानियाला वुमानिया म्हणाले आणि कलगितुरा रंगला

Operation Ganga | रोमानियाहून भारतीय विद्यार्थी मायदेशी, नारायण राणेंकडून मातृभूमीत स्वागत