Ramdas Athawale: पँथर रामदास आठवलेंनी घेतला ‘पँथर’ दत्तक, सिम्बाचा वाढदिवसही केला साजरा

मुंबईः रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी आज रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक शुल्क […]

Ramdas Athawale: पँथर रामदास आठवलेंनी घेतला 'पँथर' दत्तक, सिम्बाचा वाढदिवसही केला साजरा
पँथर रामदास आठवलेंनी घेतला 'पँथर' दत्तकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 8:28 PM

मुंबईः रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी आज रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून बिबळ्या वाघ पँथर (Panther) दत्तक घेतला आहे. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित होत्या.

वन अधीक्षक एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र मंत्री रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा तृतीय वाढदिवस आज केक कापून आणि बुद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन रिपाइंचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी केले.

पँथरसोबत पँथरचा फोटो

यावेळी बिबळ्या वाघ (पँथर) सिम्बाला भेटण्यासाठी रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले आणि पुत्र जित आठवले आले असता सर्वजण सिम्बा सिम्बा असा बिबळ्या वाघाला आवाज देत होते मात्र यावेळी बिबळ्या वाघाने कोणालाही दाद दिली नाही, त्यानंतर रामदास आठवले यांनी सिम्बा या बिबळ्या वाघाला(पँथर ) सिम्बा असा आवाज दिल्यानंतर मात्र तो पँथर रामदास आठवले नावाच्या दलित पँथरची हाक ओळखून त्यांच्या जवळ येऊन उभा राहत होता. उपस्थित सर्वांना दलित पँथरच्या आपल्या नेत्यातील पँथरची आठवण झाली आणि दोन्ही पँथरसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. या गर्दीत पँथरसोबत पँथरचा फोटो घेण्यात आला.

यावेळी हरिहर यादव, अॅड. अभया सोनवणे, सोना कांबळे, उषाताई रामळू, वंदना बेला मेहता, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.