उत्तर प्रदेशात CAA विरोधात प्रक्षोभक भाषण, डॉ. काफिल खानला मुंबईत अटक

| Updated on: Jan 30, 2020 | 7:55 AM

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात डॉ. काफिल खानने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे

उत्तर प्रदेशात CAA विरोधात प्रक्षोभक भाषण, डॉ. काफिल खानला मुंबईत अटक
Follow us on

मुंबई : गोरखपूरमध्ये प्रक्षोभक भाषण करणाऱ्या डॉ. काफिल खानला मुंबईत अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील खानने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भाषण (UP Dr Kafeel Khan Arrest in Mumbai) केलं होतं. भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने डॉ. काफिल खानला मुंबईत बेड्या ठोकल्या. 13 डिसेंबर 2019 रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासूनच तो परागंदा होता. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन काफिलची धरपकड केली.

डॉ. खानवरील पुढील कारवाई उत्तर प्रदेशमध्ये होणार असून सुरुवातीला त्याला सहार पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधून डॉ. काफिल खानला 2017 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. मेडिकल कॉलेजमधील बालकांच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.


‘मोटाभाई’ सर्वांना हिंदू किंवा मुस्लिम होण्यासाठी शिकवतात, पण माणूस होण्यास शिकवत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अस्तित्व दिसल्यापासून माझा संविधानावर विश्वास राहिलेला नाही. सीएए मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिकत्व देते आणि एनआरसी लागू होताच लोकांना त्रास दिला जाईल, असा आरोप काफिल खानने भाषणातून (UP Dr Kafeel Khan Arrest in Mumbai) केला होता.