BMC Election 2026 : बाटोगे तो पिटोगे, सुनील शुक्ला यांचा मनसेला इशारा

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी आहे. ठाकरे बंधुंसाठी यंदाची पालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. यंदा मनसे आणि उद्धव ठाकेर यांची शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे.

BMC Election 2026 : बाटोगे तो पिटोगे, सुनील शुक्ला यांचा मनसेला इशारा
Sunil Shukla-Sandeep Deshpande
| Updated on: Dec 27, 2025 | 1:38 PM

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पुन्हा एकदा मराठी महापौर पदाचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उत्तर भारतीय सेनेमध्ये शाब्दीक बाचाबाची सुरु आहे. उत्तर भारतीय सेनेने पुन्हा एकदा शिवसेना भवनासमोर वादग्रस्त बॅनर लावला आहे. ‘उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे’ #बीएमसी असं यावेळी बॅनरवर लिहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅनरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना उत्तर देण्यात आलं आहे.संदीप देशपांडे म्हणाले होते की, मराठीचा अपमान कराल तो नहीं बटोगे तो भी पिटोगे।. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अशा बॅनर्समुळे वाद होण्याची शक्यता आहे. यावर उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला बोलले आहेत.

“सुनील शुक्ला म्हणाले की, जर उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात, तर मुंबईचे महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाहीत?. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उत्तर भारतीयांना मारहाण होत आहे. सध्या मनसेची उत्तर भारतीयांविरुद्ध नेट प्रॅक्टिस सुरू आहे, जर मनसे सत्तेत आली तर सीज़न क्रिकेट सुरू होईल” अशी भिती सुनील शुक्ला यांनी व्यक्त केली.

‘नहीं बटोगे तो भी पीटोगे’

“मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात की नहीं बटोगे तो भी पीटोगे. संदीप देशपांडे आम्ही सत्तेत येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही. उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिकेत 100 मराठ्यांना तिकिटं देत आहे. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार” असं सुनील शुक्ला म्हणाले.

मतांची फाटाफूट टाळण्यासाठी हा निर्णय घेतला

मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी आहे. ठाकरे बंधुंसाठी यंदाची पालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. यंदा मनसे आणि उद्धव ठाकेर यांची शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे. मुंबईतल्या 227 वॉर्डमध्ये मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना यांनी युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.