वसई हत्या प्रकरणातील आरोपीने प्रेयसीला मारल्यावर आईला फोन लावत म्हणाला…
वसईमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जिच्यावर प्रेम केलं तिलाच प्रियकराने संवपलं होतं. भरदिवसा रोहित यादव याने आरती यादववर हल्ला करत तिला मारून टाकलं. त्यानंतर त्याने आईला फोन लावला आणि पाहा काय म्हणाला.

वसईमध्ये आपल्या प्रेयसीली मारणारा आरोपी रोहित यादव पोलीस कोठडीमध्ये आहे. आरती यादवची इतक्या क्रूरपणे का हत्या केली याच्यामागे आणखा काही कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. यावेळी तपासामध्ये त्याने धक्कादायक माहिती दिली.
वसईमध्ये आपल्या प्रियसीवर रोहित यादव याने पान्याच्या मदतीने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. मृत तरूणी आरती यादव आणि रोहित यादव यांचे गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.
आरोपी रोहित याने भरदिवसा आरतीवर जोरदार हल्ला करत तिला जागेवरच ठार केलं होतं. याआधी त्याने कट आखला होता. यासाठी रोहितने तो राहत असलेल्या भाड्याच्या घरातून गेले दोन ते तीन दिवस बाहेर फूटपाथवरच राहिला.
रोहित ज्या ठिकाणी कामाला जात होता तिथून त्याने पाना चोरला. वसईमध्ये तिचा पाठलाग केला. दोन ते तीनवेळा त्यांची भांडणे झालीत नंतर त्याने जवळील पान्याने तिच्या डोक्यावर हल्ला करत तिला संपवलं.
रोहित ज्या ठिकाणी कामाला जात होता तिथून त्याने पाना चोरला. वसईमध्ये तिचा पाठलाग केला. दोन ते तीनवेळा त्यांची भांडणे झालीत नंतर त्याने जवळील पान्याने तिच्या डोक्यावर हल्ला करत तिला संपवलं.