पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न पाच पटीने वाढलं!

| Updated on: Jun 09, 2019 | 12:51 PM

पेंग्विन आणण्याआधी राणीच्या बागेत प्रतिव्यक्ती केवळ 2 ते 5 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 पासून हे शुल्क दोन प्रौढांसह दोन मुलांना 100 रुपये करण्यात आले.

पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न पाच पटीने वाढलं!
Follow us on

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पेंग्विनने श्रीमंत केलं आहे. पेंग्निवन आणल्यापासून उद्यानाच्या उत्पन्नात प्रंचड वाढल झाल्याचे चित्र आहे. पेंग्विन आणण्यासाठी उद्यानाचे वार्षिक उत्पन्न केवळ 73 लाख रुपये होते. मात्र, पेंग्विन आणल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढली आणि आता वर्षिक उत्पन्न पाचपट झाली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं वर्षिक उत्पन्न आता पाच कोटींवर पोहोचलं आहे.

गेल्या काही दिवसात उद्यानाचा बागेचा कायापालट करण्यात आला. नवीन पक्षी, प्राणी उद्यानात आणले जात आहेत. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रासह देशविदेशातील पर्यटकही राणीच्या बागेकडे आकर्षित होते आहेत. मुंबईबाहेरील कुणी मुंबईत आल्यानंतर आवर्जून राणीच्या बागेला भेट देत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने, पर्यायाने राणीच्या बागेच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.

2014 च्या मार्च महिन्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन कक्ष पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पेंग्विन मुंबईकरांसह महाराष्ट्रातील इतर पर्यटकांसाठी तसं नवीन असल्याने, पर्यटकांचा अर्थात ओघ वाढला.

पेंग्विन आणण्याआधी राणीच्या बागेत प्रतिव्यक्ती केवळ 2 ते 5 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 पासून हे शुल्क दोन प्रौढांसह दोन मुलांना 100 रुपये करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना पेंग्विनची सफारी मोफत करण्यात आली.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्रवेशाची शुल्कवाढ करण्यात आल्याने, नाहक गर्दी सुद्धा कमी झाली. आता शुल्क वाढवल्याने खऱ्या अर्थाने पेंग्विन पाहायला किंवा उद्यानात फेरफटका मारायला येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे वार्षित 40-50 लाखांवरील उत्पन्न आता थेट चार-पाच कोटींवर पोहोचले आहे.

दरम्यान, ज्यावेळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता, त्यावेळी अनेकांकडून टीका झाली होती. मुंबईच्या वातावरणात पेंग्विन जगतील का, इथपासून, ते त्यांचा सांभाळ करण्यासाठी लागणारा खर्च महापालिकेला झेपणार आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता स्थिती अशीय की, पेंग्विनमुळे उद्यानाचे उत्पन्न पाचपट वाढले आहे.