Vinayak Mete : ‘आमचे दोन आमदार, योग्य न्याय दिला नाही तर राज्यसभेबाबत निर्णय जाहीर करु’, विनायक मेटेंचा फडणवीसांना अल्टिमेटम

| Updated on: Jun 08, 2022 | 8:22 PM

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, भाजपनं त्यांना यावेळी उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे विनायक मेटे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेटे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उमेदवारीबाबत त्यांनी फडणवीसांना अल्टिमेटम दिला आहे.

Vinayak Mete : आमचे दोन आमदार, योग्य न्याय दिला नाही तर राज्यसभेबाबत निर्णय जाहीर करु, विनायक मेटेंचा फडणवीसांना अल्टिमेटम
विनायक मेटे यांना विधान परिषद नाकारली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ राज्यात विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची (Five Candidates) नावं जाहीर केली आहेत. त्यातील 4 उमेदवारांचे अर्जही दाखल करण्यात आले आहेत, तर उद्या एका उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपकडून या निवडणुकीत मित्रपक्षांना डावलल्याचं पाहायला मिळत आहे.

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, भाजपकडून त्यांना यावेळी उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे विनायक मेटे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मेटे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उमेदवारीबाबत त्यांनी फडणवीसांना अल्टिमेटम दिला आहे.

 चर्चेतील उमेदवारानाच डावलले

सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि पंकजा मुंडे या राजकारणातील चर्चेतील उमेदवारानाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. यावेळी विनायक मेटे यांनाही उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अल्टीमेटम दिला आहे. सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना उमेदवारी देण्यात आले नसल्यानेत नाराजीचा सूरही दिसून येत आहे.

नावं डावलण्यात आली

विधान परिषदेची निवडणूक लागल्यापासून पंकजा मुंडे आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची नावं ही सतत चर्चेत राहिली. मात्र प्रत्यक्षात यादी आल्यावर मात्र त्या यादीत सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची कोणाचीच नावं नव्हती. भाजपकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये पंकजा मुंडे यांचंही नाव आले नसल्याने त्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल चढवणारे सदाभाऊ खोत यांनाही यावेळी डावलण्यात आलं आहे. या दोन नावाबरोबरच विनायक मेटे यांनाही डावलण्यात आले असल्याने नाराजगी दिसत आहे.