विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, महापौर रितू तावडे यांच्याकडून घोषणा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद अखेर रद्द झालं आहे. महापौर रितू तावडे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, महापौर रितू तावडे यांच्याकडून घोषणा
Image Credit source: facebook
| Updated on: Sep 07, 2026 | 3:38 PM

शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.  जात पडताळणीत त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचं पद धोक्यात आलं होतं.  विशाखा राऊत यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्याचं नगरसेवक पद जाणार, हे स्पष्ट झालं होतं. अखेर  महापौर रितू तावडे यांच्याकडून त्यांचं नगसेवक पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या सभेत त्यांचं पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.  नगरसेवक पद रद्द होण्यासोबतच विशाखा राऊत यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर संकटात आलं आहे. विशाखा राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवर निवडणूक लढण्यासाठी पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.

विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या जागेवर अत्यंत्य चुरशीची लढाई झाली होती. त्यांनी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता.. विशाखा राऊत यांना या निवडणुकीत 13,326 मते मिळाली होती. तर प्रिया सरवणकर यांना 13,039 मतं पडली होती. अवघ्या 197 मतांनी विशाखा राऊत यांनी विजय मिळवला होता.

प्रिया सरवणकर यांनी जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आणि क्षेत्राधिकारावर आक्षेप घेत समितीकडे दाद मागितली होती. तक्रारीची दखल घेतल्यानंतर तपासणी केल्यानंतर जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांचं नगरसेवक पद अडचणीत आलं. या नंतर विशाखा राऊत यांनी राजकीय दबाव आणून कट कारस्थान रचल्याचा आरोप केला. इतकंच काय तर सदा सरवणकर यांच्यावरही घणाघाती टीका केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us